शिक्षण अभियांत्रिकीचे, काम रुग्णालय सफाईचे! 

मनोज साखरे
बुधवार, 23 जानेवारी 2019

औरंगबाद - अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले, पीएच.डी.धारक आणि उच्चशिक्षित तरुण घाटी रुग्णालयात चक्क चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून काम करीत असल्याची बाब समोर आली आहे. श्रमाला प्रतिष्ठा आहे; परंतु ज्ञानाला नव्हे, असाच काहीसा प्रकार येथे असून रोजगाराची समस्या आणि सरकारी नोकरी म्हणून चक्क सफाईकाम करण्याची वेळ अशा उच्चशिक्षितांवर आली आहे. 

नीलेश सुभाष बनसोडे (वय 26, रा. एन-7, सिडको) या तरुणाने गळफास लावून राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. 21) रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकारानंतर जिन्सी पोलिसांनी मध्यरात्री बाराच्या सुमारास त्याला घाटीत दाखल केले. मात्र, त्याला डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. नीलेशची माहिती पोलिसांनी घेतली त्यावेळी तो घाटी रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी असल्याचे समोर आले. शहरातील एका खासगी महाविद्यालयात तो अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करीत होता. वडिलांच्या निधनानंतर त्याला अनुकंपावर घाटी रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नोकरी लागली. अभियंता होत असतानाही त्याने ही नोकरी स्वीकारली. यासह घाटी रुग्णालयात सफाईचे काम करणाऱ्या कामागरांच्या शिक्षणाची माहिती घेतली असता अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही सफाईचे काम करीत असल्याचा आणखी एकजण असल्याची बाब समोर आली. विशेषत: उच्चविद्याविभूषित 

(पीएच.डी.धारक) तसेच उच्चशिक्षण घेणारे सात ते आठजण सफाईचे काम करीत असल्याची माहिती त्यातीलच एका उच्चशिक्षित कामगाराने दिली. 

सरकारी नोकरीकडे ओढा 
डी.एड., बी.एड.सारखी अभियांत्रिकी महाविद्यालये व विद्यार्थ्यांची स्थिती आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात नवीन विद्यार्थ्यांना नोकरीची लवकर संधी मिळेल याची शाश्‍वती नाही. तसेच अन्य उच्चशिक्षितांना खासगी क्षेत्रात मिळणारे तोकडे वेतन, मंदी, मर्यादित नोकऱ्या आदी कारणांमुळे सरकारी नोकरीचे वलय कायम आहे.

Web Title: Education Engineering Work Hospital Cleaning