शिक्षणाधिकाऱ्यांचा गोपनीय अहवाल शासनाकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

उस्मानाबाद - विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याविरुद्ध प्रशासन विभागाने कडक पावले उचलली आहेत. त्यांच्यासंदर्भातील गोपनीय अहवाल गुरुवारी (ता. 19) वरिष्ठांना पाठविला आहे. त्यामुळे जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्‍यता आहे. महिला कर्मचाऱ्याच्या छळवणूकप्रकरणी जगताप यांच्याविरुद्ध विलंबाने का होईना गुन्हा नोंद झाला असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागल्याने प्रशासनाने तसा अहवाल ग्रामविकास विभाग व शिक्षण आयुक्तांकडे पाठविला आहे. दरम्यान, आता वरिष्ठ पातळीवर लवकर निर्णय होण्याची गरज असून, जगताप यांना पाठीशी घालण्याचे काहीच कारण नसल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
Web Title: education officer report to government