फरारी शिक्षणाधिकारी पोलिसांना शरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

उस्मानाबाद - महिला कर्मचाऱ्याचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर महिनाभरापासून फरारी असलेला वादग्रस्त शिक्षणाधिकारी सचिन जगताप अखेर मंगळवारी पोलिसांना शरण आला. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात तो हजर झाला.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील एका महिला कर्मचाऱ्याचा छळ केल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी जगताप याच्याविरोधात 16 एप्रिलला आनंदनगर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.

तेव्हापासून तो फरारी होता. अटकपूर्व जामिनासाठी त्याने जिल्हा सत्र न्यायालय त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज केले होते. मात्र न्यायालयाने ते फेटाळले. त्यानंतरही जगताप पोलिसांना सापडत नव्हता. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात होता.

Web Title: education officer surrender crime