"एज्युस्पायर एक्‍स्पो' पाल्यांना ठरेल दिशादर्शक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

औरंगाबाद - दहावी, बारावीनंतर काय? हा प्रश्‍न विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही सतावत असतो. याचवेळी नेमक्‍या मार्गदर्शनाची गरज ओळखून "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'अंतर्गत यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)तर्फे एज्युस्पायर ऍडमिशन एक्‍स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात 10 ते 12 जूनदरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजतादरम्यान हा एक्‍स्पो होणार आहे. 

भविष्यातील शिक्षणाच्या संधी, बदललेले अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, करिअरच्या विविध संधी आणि बदलत्या तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन "एज्युस्पायर ऍडमिशन एक्‍स्पो'मधून होईल. एक्‍स्पोच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या एक्‍स्पीरियन्स झोनमध्ये बदलत्या तंत्रज्ञानाचा मागोवा घेता येणार आहे. रोबो, नॅनो ड्रोन, व्हर्च्युअल रिऍलिटी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयआरव्हीआर आदी तंत्रांचा अनुभव घेता येणार आहे. 

"यिन'ने महाविद्यालयीन तरुणांसाठी आयोजित केलेल्या यिन समर यूथ समिटच्या निमित्ताने हा एक्‍स्पो होणार आहे. स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी एक्‍स्पोची मुख्य प्रायोजक आहे. पॉवर्ड बाय डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी, पिंपरी, पुणे हे आहेत. एक्‍स्पोच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या एक्‍स्पीरियन्स झोनमध्ये बदलत्या तंत्रज्ञानाचा मागोवा घेता येणार आहे. रोबो, नॅनो ड्रोन, व्हर्च्युअल रिऍलिटी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयआरव्हीआर आदी तंत्रांचा अनुभव घेता येणार आहे. 

दुपारी 4.45 ते 5.15 वाजता : नंदिनी भावसार, संचालक, इन्फोसिस कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट 
सायंकाळी 5.15 ते 6 वाजता : सोमय मुंडे, आयपीएस 

Web Title: eduspire expo auranagbad news