औरंगाबादेत ईद-उल-फित्र उत्साहात साजरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

शहरातील रोजाबाग, रेल्वेस्टेशन भागातील शहाशोख्तामियॉं, उस्मानपुरा, पडेगाव, बीड बायपास रोड येथील ईदगाह व शहरातील मशीदींमध्ये सकाळी नमाज पठण करण्यात आली. शहरात सर्वत्र रमजान ईदचा उत्साह दिसून आला. ईदगाह मैदानावर झालेल्या मुख्य नमाज पठणास हजारो मुस्लिम बांधव नवीन पोशाख परिधान करून उपस्थित होते. 

औरंगाबाद : महिनाभर रोजे करून अल्लाहची इबादत केल्यानंतर शुक्रवारी (ता. 15) सायंकाळी चंद्रदर्शन झाले. त्यानंतर शहरातील मुस्लिम बांधवांनी शनिवारी (ता.16) ईद उल फित्र पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी केली. छावणीतील ईदगाह मैदानावर सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हजारोंच्या संख्येने उपस्थित मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. यानंतर गळाभेट घेत एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

शहरातील रोजाबाग, रेल्वेस्टेशन भागातील शहाशोख्तामियॉं, उस्मानपुरा, पडेगाव, बीड बायपास रोड येथील ईदगाह व शहरातील मशीदींमध्ये सकाळी नमाज पठण करण्यात आली. शहरात सर्वत्र रमजान ईदचा उत्साह दिसून आला. ईदगाह मैदानावर झालेल्या मुख्य नमाज पठणास हजारो मुस्लिम बांधव नवीन पोशाख परिधान करून उपस्थित होते. 

यावेळी काही ज्येष्ठांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वधर्म समभाव व शांतीचा संदेश दिला. पोलिस आणि शांतता समितीच्या सदस्यांनीही ईदगाह मैदानावर जाऊन गुलाबपुष्प देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. सकाळपासून एकमेकांची गळाभेट घेत ईद मुबारक अशा शुभेच्छा देण्यात येत होत्या. फेसबुक, व्हॉट्‌सऍप अशा सोशल मीडियावरही मित्रांना ईदचे संदेश दिले जात होते. ईद मुबारकच्या शुभेच्छा संदेशाचा वर्षाव देखिल सोशल मीडियावर दिसून येत होता. दरम्यान यावर्षी रमजान महिन्यात पाच शुक्रवार आले. शेवटच्या शुक्रवारी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करण्यासाठी जामा मशीद येथे अलोट गर्दी केली होती. त्यानंतर बाजारात खरेदीसाठी अलोट अशी गर्दी पाहायला मिळाली. 

Web Title: eid celebrate in Aurangabad