मयूरनगर, नवजीवन कॉलनीत आठ मुलांचे कुत्र्याने तोडले लचके

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

मयूरनगर, नवजीवन कॉलनीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून, शनिवारी (ता. सहा) रात्री रस्त्यावर खेळणाऱ्या सात मुलांना कत्र्याने चावा घेतला होता.

औरंगाबाद -  मयूरनगर, नवजीवन कॉलनीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून, शनिवारी (ता. सहा) रात्री रस्त्यावर खेळणाऱ्या सात मुलांना कत्र्याने चावा घेतला होता. रविवारी (ता. सात) या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला नाही. त्यात सकाळी आणखी एका मुलाला कुत्रा चावला. दोन दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्यामुळे या भागात भीतीचे वातावरण आहे.

शनिवारी एका गल्लीमध्ये मुले खेळत होती. या वेळी पिसाळलेल्या कुत्र्याने इशांत बुटेले, मयूर झोपे, आराध्या खंडेलवाल, कार्तिक ब्रह्मपल्ली या चार मुलांचे लचके तोडले. त्यानंतर या कुत्र्याने नवजीवन कॉलनीतील तीन मुलांचा चावा घेतला. नागरिकांनी या मुलांना तत्काळ घाटी रुग्णालयात नेऊन औषधोपचार केले. रविवारी सकाळी पुन्हा याच कुत्र्याने एका मुलाचा लचका तोडला असल्याचे नागरिकांनी सांगितले. आठ मुलांमध्ये एक दोन वर्षांची मुलगी आहे. शनिवारी रात्री कुत्रा चावल्याचे नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली होती; मात्र रविवारीही या कुत्र्याला पकडले नसल्याने रविवारी एका मुलाला चावा घेतल्याचे समोर आले.

Web Title: Eight children were bites by the dogs in aurangabad