बीड जिल्ह्यात भीषण अपघात, आठ जण ठार; दोघे जखमी

जालिंदर धांडे
Monday, 11 November 2019

पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथील घटना, बेलोरोची ट्रकला धडक 

बीड - उभ्या ट्रकला जीप मागच्या बाजूने धडकून झालेल्या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी झाल्याची घटना वैद्यकिन्ही (ता. पाटोदा) येथे आज (सोमवारी) सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली.  घटनेतील मृत निवडुंगवाडी (ता. बीड) येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

वैजनाथ ज्ञानोबा तांदळे, बाळू पंढरीनाथ मंडे, केसरबाई बन्सी मुंडे , अशोक गबरू मुंडे, असराबाई भीमराव मुंडे ( सर्व रा. निवडुंगवाडी ता. जि बीड) अशी मृतांपैकी काहींंची नावे आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Image may contain: car

निवडुंगवाडी येथील वरील लोक बोलेरो जीपने (क्रमांक, एमएच,२३,एएस.३४७०) पाटोदाकडे जात होते. वैद्यकीन्ही येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जीपने मागून जोराची धडक दिली. यात वरील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. अपघातानंतर जीपचा समोरच्या बाजूचा चुराडा झाला. ट्रकचा मागचा भाग जीपमध्ये घुसल्याने जीपमधील लोक ठार झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight killed in accident at waidyakinhi dist beed