"स्थायी'च्या आठ सदस्यांची  निवड होणार येत्या शनिवारी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

औरंगाबाद - महापालिकेच्या आठ स्थायी समिती सदस्यांबरोबर विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यासाठी येत्या शनिवारी (ता. 29) सकाळी 11 वाजता विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. महापौर भगवान घडामोडे यांच्या अध्यक्षेखाली या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

औरंगाबाद - महापालिकेच्या आठ स्थायी समिती सदस्यांबरोबर विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यासाठी येत्या शनिवारी (ता. 29) सकाळी 11 वाजता विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. महापौर भगवान घडामोडे यांच्या अध्यक्षेखाली या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

या सर्वसाधारण सभेमध्ये स्थायी समितीच्या आठ, महिला व बालकल्याण समिती, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती, शहर सुधार समिती, माध्यमिक, पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिती, गलिच्छ वस्ती निर्मूलन, घर बांधणी व समाजकल्याण समिती अशा पाच विषय समित्यांमधील प्रत्येकी नऊ सदस्यांची निवड या सभेमध्ये होणार आहे. स्थायी समिती वगळता इतर विषय समितींमध्ये सदस्य होण्यासाठी नगरसेवक फारसे इच्छुक नाहीत; मात्र अर्थपूर्ण अशा स्थायी समितीमध्ये सदस्य होण्यासाठी अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याची चर्चा आहे. या वेळी युतीतील अलिखित करारानुसार आगामी वर्षभरासाठीचे सभापतिपद भाजपकडे आहे. निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांपैकी भाजपकडून नितीन चित्ते यांचा समावेश आहे. यामुळे त्या रिक्‍त जागेवर निवडून येऊन सभापतिपदापर्यंत पोहचण्याची अनेकांची इच्छा असल्याने स्थायी समितीत जाणाऱ्या इच्छुकांची भाजपमध्ये जास्त संख्या आहे. 

स्थायी समितीतील 16 सदस्यांपैकी शिवसेनेचे विद्यमान सभापती मोहन मेघावाले, मकरंद कुलकर्णी, गजानन मनगटे, रावसाहेब आमले, कमलाकर जगताप, भाजपचे नितीन चित्ते, "एमआयएम'चे विकास एडके आणि समीना शेख यांचा दोन वर्षांचा कार्यकाल संपणार आहे. या रिक्‍त आठ जागांवर नवीन सदस्य निवडून येतील. 

Web Title: Eight members of "Permanent" will be elected on Saturday