ग्रामविकासाला रिक्त पदाचे ग्रहण; गटविकास अधिकाऱ्यांची सोळा पैकी आठ पदे रिक्त

Eight out of the sixteen municipal development officers are vacant in nanded
Eight out of the sixteen municipal development officers are vacant in nanded

नांदेड : जिल्हा परिषदेच्या स्वच्छता-पाणीपुरवठा व नरेगा विभाग प्रमुखांची पदे रिक्त अाहेत. महिणाभरापासून प्रभारी पदामुळे जिल्हाभरातील महात्मागांधी राष्ट्रीय रोजगार, स्वच्छता व पाणीपुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम उत्तर व दक्षीनच्या विभाग प्रमुखांची पदे रिक्त आहेत. गाविकासाला चालना देणाऱ्या पंचायत समिती स्तरावर सोळा पैकी आठ गटविकास अधिकारी पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषदेच्या ग्रामविकासाल रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.

शासनाच्या विविध योजनांच्या विविध लोकल्याणकारी योजनांच्या सक्षम
अांमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांंसह तालुकास्तरावर
गटविकास अधिकाऱ्यांचे पद जबाबदार अाहे. नागरीकांच्या मुलभुत गरजांसाठी योजनांच्या प्रशासकिय, तांत्रिक मान्यतेसाठी वर्ग एक व दोन प्रशासकिय यंत्रणेचे अविभाज्य घटक असताना प्रभारींच्या खांद्यावर भार सोपवण्यात आला आहे. मुख्यालयातील स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी. एल. रामोड यांची महिणाभरापूर्वी भोकर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारीपदी प्रशासकिय बदली करण्यात आली. नरेगा विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी कल्पना क्षिरसागर यांची औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या पंचात विभागामध्ये उपमुख्यकार्यकारी अधिकारी पदी बदली नुसार नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या रिक्त पदामुळे रोजगार योजनेला घरघर लागली आहे. दोन वर्षापूर्वी ग्रामीण पाणीपुरठ्याचे कार्यकारी अभियंता श्री. निवडुंगे याच्यावरील कारवाईमुळे जी. एल. यंबलवाड, मिलींद गायकवाड यांच्या भोवतीच विभागाची प्रभारी चक्र फिरत आहे. सार्वजकिन बांधकाम विभाग (उत्तर व दक्षीण) चे कार्यकारी अभियंता पदेही रिक्त असल्याने एकूण विभागाचा भार मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांवर पडला अाहे.

विभागातील रिक्त पदामुळे नविन प्रस्तावांना वेळेत मान्यतेला अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हाप्रशासना प्रमाणेच तालुकास्तरावर एकून सोळा पैकी आठ पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी पद रिक्त असून लकवरच माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारीही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने जिल्हा परिषदेच्या ग्रामविकासाला रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे.

गावपतळीवर योजनांच्या सक्षमीकरणासाठी पंचायत समितीस्तरावर पुर्णवेळ गटविकास अधिकाऱ्यांच्या अवश्‍यकतेसह मुख्यालयातील विभाग प्रमुखांची रिक्त पदे भरण्यासाठी मंत्रालयस्तरावर मुख्यसचिवांकडे पाठपुरावा सुरू आहे. - अशोक काकडे (मुख्यकार्यकारी अधिकारी)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com