हिंगोलीत आठ जणांना अन्नातून विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

कळमनुरी (जि. हिंगोली) - नातेवाइकांसाठी पाहुणचार म्हणून केलेली खिचडी व भजी खाल्ल्याने आठ जणांना विषबाधा झाल्याची घटना डिग्रसतर्फे कोंढूर (ता. कळमनुरी) येथे शनिवारी (ता. 29) मध्यरात्री घडली. या रुग्णांवर रविवारी (ता. 30) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

डिग्रसतर्फे कोंढूर येथील साहेबराव नामदेवराव मगर यांच्याकडे शनिवारी नातेवाईक आले होते. त्यांना पाहुणचार म्हणून रात्री खिचडी-भजी जेवणात केले होते. सायंकाळी साडेसातला सर्वांनी एकत्रित जेवण केले; मात्र मध्यरात्री उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. या प्रकाराने घाबरून गेलेल्या मगर कुटुंबीयांनी रविवारी (ता. 30) सकाळीच कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना दाखल केले. अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे रुग्णालयाने सांगितले.

Web Title: Eight people get food poisoning in Hingoli