esakal | चोरीच्या आठ मोटारसायकली जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

latur police

चोरीच्या आठ मोटारसायकली जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : काही महिन्यांपासून मोटारसायकल चोरीचे प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांकडून याचा तपासही केला जात आहे. यात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख ६० हजार रुपयांच्या आठ मोटारसायकली जप्त केल्या. येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे. यात आणखी एक संशयित आरोपी असून, त्याचाही शोध पोलिस घेत आहेत.

हेही वाचा: कोरोनारुग्ण असलेल्या गावात शाळा बंदच; पाहा व्हिडिओ

जिल्ह्यात मोटारसायकली चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी मोटारसायकल चोरी संबंधाने घडलेल्या गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भातलवंडे यांना तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यासाठी स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

हेही वाचा: केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे रंगले सारीपाटाच्या खेळात;पाहा व्हिडिओ

या मोहिमेअंतर्गत पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. हा तपास सुरू असताना या पथकाला विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीतील संशयित आरोपी गरूड चौक, नांदेड नाका परिसरात असून, तो चोरलेल्या दोन मोटरसायकल विकण्याच्या प्रयत्नात परिसरात फिरत आहे, अशी माहिती मिळाली. या पथकाने रविवारी (ता. पाच) गरुड चौकात सापळा लावला होता. माहितीप्रमाणे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित एक अल्पवयीन मुलगा तेथे आला. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आणखी एका साथीदाराच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटारसायकली चोरल्याची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये मनसेचे घंटानाद आंदोलन; पाहा व्हिडिओ

दोन मोटार सायकली घरासमोर लावल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर हे पथक शिरूर अनंतपाळ येथे त्याच्या घरी गेले. तेथे पोलिसांना सहा मोटारसायकली मिळून आल्या. या सर्व मोटार सायकली चोरीच्या असल्याचे या मुलाने पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या मोटार सायकली जप्त केल्या आहेत. या मुलाला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी विवेकानंद चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई श्री. भातलवंडे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक सूर्यवंशी पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिल्लापट्टे, राजू मस्के, सदानंद योगी, मोहन सुरवसे, नकुल पाटील यांनी केली.

loading image
go to top