Good News : उमरगा कोविड रुग्णालयासाठी आठ व्हेंटिलेटर 

अविनाश काळे
Sunday, 26 July 2020

कोविड रूग्णालयात उपलब्ध असलेल्या दोन पैकी एक व्हेंटिलेर नादुरुस्त असल्याने एका व्हेंटिलेटरवर प्रकृती गंभीर झालेल्या कोविड रुग्णांवर उपचारासाठी अडचणी निर्माण होत होत्या. याबाबत "सकाळ" ने व्हेंटिलेटरच्या आवश्यकतेबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. आरोग्य विभागाने ही गरज लक्षात घेऊन दोन दिवसापूर्वी कोविड रुग्णालयासाठी आठ व्हेंटिलेटर उपलब्ध करुन दिले आहेत.

उमरगा : शहर व परिसरात एक महिन्याच्या कालावधीत कोविड रुग्णांची संख्या १४४ पर्यंत पोहचली आहे, त्यातील अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५७ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गंभीर रुग्णांवर व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे अडचणी निर्माण होत होत्या. आता मुंबई येथून आरोग्य विभागाने रुग्णालयासाठी आठ व्हेंटिलेटर पाठविल्याने अडचण थांबणार असून दोन दिवसात व्हेंटिलेटर कार्यान्वित होतील असे अधिकृत सूत्राने सांगितले.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वप्रथम उमरगा शहर व तालुक्यात दोन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले होते. २० एप्रीलला तीन रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र मार्च महिन्यात मुंबई- पूणेच्या कनेक्शनमुळे संख्या चौदावर गेली. त्यातील बेडग्याच्या एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. १० जूनला शेवटच्या रुग्णाला डिस्चार्ज दिल्याने तालुका कोरोनामूक्त झाला होता. मात्र मुंबईहुन गावाकडे परतलेल्या बेटजवळग्याच्या बसचालक १६ जुनला पॉझिटिव्ह निघाला. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

२५ जूनला घेतलेल्या स्वॅबचा अहवाल २७ जुनला आला आणि त्यात बालाजी नगरचा एका व्यक्ती पॉझिटिव्ह आला. तेंव्हापासुन आत्तापर्यंत बाधितांची संख्या १४४ झाली असून त्यात शहरातील संख्या १०४ तर ग्रामीणमधील ४० बाधित होते. अकरा जणांचा मृत्यू झाला आहे त्यात शहरातील मृत्यूची संख्या पाच तर ग्रामीण मधील सहा आहे.  दरम्यान संसर्ग सुरू झाल्यापासुन तालुक्यातील एकुण बाधितांची संख्या १६२ आहे तर बारा जणांचा मृत्यु झाला आहे. शनिवारी रात्री ७६ जणांच्या प्राप्त झालेल्या अहवालात पालिकेच्या एका सफाई कामगारासह गुंजोटीच्या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

व्हेंटिलेरच्या सोयीने उपचारात सुलभता येईल 

कोविड रूग्णालयात उपलब्ध असलेल्या दोन पैकी एक व्हेंटिलेर नादुरुस्त असल्याने एका व्हेंटिलेटरवर प्रकृती गंभीर झालेल्या कोविड रुग्णांवर उपचारासाठी अडचणी निर्माण होत होत्या. याबाबत "सकाळ" ने व्हेंटिलेटरच्या आवश्यकतेबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. आरोग्य विभागाने ही गरज लक्षात घेऊन दोन दिवसापूर्वी कोविड रुग्णालयासाठी आठ व्हेंटिलेटर उपलब्ध करुन दिले आहेत. दोन दिवसात संबंधित अभियंता आल्यानंतर ही यंत्रणा कार्यान्वित होईल आणि गरजू रुग्णांना त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी मदत होईल.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

पंचशिलनगरमधील सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू

गेल्या चार दिवसापासुन सोलापूर येथे उपचार सुरू असलेल्या शहरातील पंचशिलनगरमधील एका सेवानिवृत्त शिक्षकाचा रविवारी (ता. २६) मृत्यु झाला, दोन दिवसापूर्वी त्यांच्या अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

Edited by pratap awachar 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight ventilator for Umarga Kovid Hospital