जागेच्या वादातून धाकट्याने केला थोरल्या भावाचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथून जवळच असलेल्या सावरगाव येथे जागेच्या वादातून 50 वर्षीय धाकट्या भावाने 70 वर्षीय थोरल्या भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शनिवारी (ता.29) रात्रीच्या सुमारास घडली.

चारठाणा : जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथून जवळच असलेल्या सावरगाव येथे जागेच्या वादातून 50 वर्षीय धाकट्या भावाने 70 वर्षीय थोरल्या भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शनिवारी (ता.29) रात्रीच्या सुमारास घडली.

लिंबाजी बाबुराव सोनुळे (रा.सावरगाव) असे 70 वर्षीय भावाचे नाव आहे. त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांचा यामध्ये मृत्यू झाला. आबाजी सोनुळे असे आरोपीचे नाव असून, चारठाणा पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर आरोपी आबाजी यास ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: The elder brothers murder for land issue

टॅग्स