कॉंग्रेस पुनरावृत्ती करणार की शिवसेना जागा परत घेणार?

कॉंग्रेस पुनरावृत्ती करणार की शिवसेना जागा परत घेणार?

औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर विरुद्ध विद्यमान आमदार सुभाष झांबड यांच्यात लढत रंगण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

विद्यमान आमदार झांबड यावेळी पुनरावृत्ती करणार की संख्याबळ आणि सत्तेच्या जोरावर शिवसेना हा मतदारसंघ पुन्हा परत मिळवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा शुक्रवारी (ता.19) कार्यक्रम जाहीर झाल्याने उमेदवार निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. युतीचे संख्याबळ लक्षात घेता युतीच्या विजयाची शक्‍यता असली तरी अपक्षांवर अवलंबून राहावे लागेल. यामुळे दोन्ही पक्षांकडून अपक्षांची मते आपल्या बाजूने वळवणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरू आहे. 

शिवसेनेकडून जालन्याचे आमदार व राज्यमंत्री अर्जुन खोतकर, मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील, राजू वैद्य यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदीदेखील प्रयत्नरत आहेत. लोकसभा निवडणुकीत श्री. खोतकर यांनी भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधातील बंड मागे घेतले, स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या उमेदवारीसह निवडून आणण्याची त्यांची अट होती, अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची जास्त चर्चा आहे, तर दुसरीकडे विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर "मातोश्री'वर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शिवाय सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्याचे घनिष्ठ संबंध असल्याने त्यांचे
नावही चर्चेत आहे. 
 

झांबड यांची पुन्हा तयारी 
ही जागा कॉंग्रेसकडे असली तरी उमेदवारीच्या बाबतीत पक्षात सध्या तरी शांतताच आहे. शिवसेना-भाजपचे वाढलेले संख्याबळ, राज्यातील सत्ता पाहता या निवडणुकीत कॉंग्रेसचा टिकाव लागेल की नाही, या शक्‍यतेने कॉंग्रेसकडे सुभाष झांबड यांच्याशिवाय दुसरे नाव सध्यातरी नाही.  लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी श्री. झांबड यांनी 'औरंगाबाद-जालना'तून पुन्हा लढण्याची तयारी दाखवली आहे. वर्ष 2013 मध्ये निवडणूक लढण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. दुसरे कुणी फारसे इच्छुक नसल्याने पक्षश्रेष्ठी पुन्हा एकदा श्री. झाबंड यांच्यावरच विश्‍वास दाखवण्याची अधिक शक्‍यता आहे. 
 
   पक्षीय बलाबल 

  • कॉंग्रेस-167 
  • भाजप- 159 
  • शिवसेना-139 
  • राष्ट्रवादी- 83 
  • एमआयएम-27 
  • इतर- 41 
  • एकूण 616 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com