प्रचार पोचतोय अंतिम टप्प्यात 

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

जालना -  विधानसभा निवडणुकीसाठी येत्या सोमवारी (ता.21) मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी देशाच्या पंतप्रधानांपासून सर्व पक्षांच्या दिगज्ज नेत्यांच्या जिल्ह्यात सभा झाल्या आहेत. त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यात प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहे. 

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली. त्यानंतर प्रचाराच्या आखाड्यात सारे उतरले. आतापर्यंत जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परतूर येथे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांची घनसावंगी येथे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे, भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अंबड येथे सभा झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
या दिगज्ज नेत्यांच्या सभांनंतर आता प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक पक्षासह अपक्ष उमेदवार आपल्या प्रचारासाठी धावपळ करत आहेत. मतदारांच्या भेटी, सभा, बैठका घेऊन आपण कसे योग्य, निवडून आल्यानंतर काय करणार या सर्व बाबींचा लेखाजोखा मांडत मतदारांची मनधरणी करीत आहेत. त्यामुळे आता शेवटचे हे दोन दिवस उमेदवारांना प्रचारासाठी अति महत्त्वाचे असणार आहेत, यात शंका नाही. 

रात्री उशिरापर्यंत प्रचार 
अनेक उमेदवार आपल्या मोजक्‍या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत; तसेच अंधारात भेटी घेऊन नाराज असलेल्या गटाची मनधरणी केली जात आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसदेखील जिल्ह्यात छुपा प्रचार जोर धरणार आहे, यात शंका नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com