निवडणूक कार्यक्रमाची घोषणा 7 जानेवारीला? 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

मुंबई - नव्या वर्षाच्या सुरवातीच्या आठवड्यातच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. राज्यातील 10 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तारखा 7 जानेवारीला घोषित होण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई - नव्या वर्षाच्या सुरवातीच्या आठवड्यातच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. राज्यातील 10 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तारखा 7 जानेवारीला घोषित होण्याची शक्‍यता आहे. 

या निवडणुका चार टप्प्यांत होणार असून, महापालिका क्षेत्रात अंतिम मतदार यादी 5 जानेवारीला घोषित होईल. महापालिकांनी महापौरांची निवड 8 मार्चपूर्वी करायची आहे. 15 ते 22 फेब्रुवारीदरम्यान या निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका ज्या जिल्ह्यात होणार आहेत, त्या एकत्रित होण्याची शक्‍यता निवडणूक आयोगातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर या महापालिका आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, नगर, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढील वर्षात होतील.

Web Title: Elections announced on January 7