निवडणुकीपूर्वीच शहरात दंगल का होते? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

औरंगाबाद - निवडणुका जवळ आल्या की औरंगाबादेत दंगल का होते? अशा प्रश्‍न काँग्रेस नेते, खासदार हुसेन दलवाई यांनी बुधवारी (ता. १६) केला. दंगल सुरू असताना शिवसेनेचे खासदार या ठिकाणी काय करत होते? याबाबत शंका व्यक्त करत चंद्रकांत खैरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. 

काँग्रेस नेते श्री. दलवाई यांनी बुधवारी शहरातील दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की निवडणुका जवळ आल्या की औरंगाबादेत नेहमीच दंगल होते. याची चौकशी झाली पाहिजे. पोलिसांकडून एकाच समाजावर अन्याय झाल्याचे समोर आले आहे. ज्या युवकाचा मृत्यू झाला, त्याच्या घरात कोंबिंग ऑपरेशन केले जाते? याला काय म्हणावे, यावेळी ‘जय श्रीरामच्या’ घोषणा दिल्याचा आरोप दलवाई यांनी केला. पोलिसांना दंगल रोखण्यात अपयश आले. त्यांनी पोलिसांची वर्दी काढून ठेवली पाहिजे होती. याबाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी 
गृहराज्यमंत्र्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली; मात्र चार दिवस लोटले तरी गृहमंत्री येथे आले नाहीत. गृहखाते हे स्वत: मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे त्यांनी येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करायला हवी होती, असे मत दलवाई यांनी व्यक्त केले. 

Web Title: Before the elections Why are there riots in the city