विद्यार्थ्यांना कंदिलाचा आधार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

उस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान भारनियमन सुरू असल्याने विद्यार्थ्यांना कंदिलाचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अद्यापही अंधारातच असल्याचे यावरून दिसून येत आहे. 

उस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान भारनियमन सुरू असल्याने विद्यार्थ्यांना कंदिलाचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अद्यापही अंधारातच असल्याचे यावरून दिसून येत आहे. 

पुढील महिन्यापासून बारावीची, तर मार्च महिन्यात दहावीची परीक्षा सुरू होत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यां अभ्यासाच्या प्रक्रियेत गुंग असतात. अशाच स्थितीत आता वीजवितरण कंपनीने भारनियमनाच्या वेळेत बदल केला आहे. जिल्ह्यातील काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत भारनियमन सुरू केले आहे. ही वेळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची असते. परंतु, अचानक भारनियमनात बदल केल्याने विद्यार्थ्यांची पुरती हेळसांड सुरू झाली आहे. त्यामुळे पारंपरिक प्रकाशस्रोत असलेल्या कंदिलावर अभ्यास करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. कंपनीने सुरू केलेले वेळापत्रक चुकीचे असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे. 
 
"लोड' कमी तरीही भारनियमन? 
सध्या ग्रामीण भागातील कृषिपंपांचा विजेचा भार पूर्णपणे घटला आहे. दुष्काळाने विहिरी; तसेच कूपनलिका कोरड्या पडल्याने विजेची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. तरीही वीजवितरण कंपनीने भारनियमन सुरू केले आहे. सायंकाळी भारनियमन असल्याने ग्रामीण भागातील महिलांना अंधारात चाचपडत स्वयंपाक करण्याची वेळ येत आहे. दरम्यान, भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अद्यापही अंधारातच असल्याचे जिल्ह्यातील अशा प्रकारावरून दिसून येत आहे. 
 
ही अभ्यासाची वेळ असते. अन्‌ त्याच वेळी वीज गायब होत आहे. त्यामुळे आमच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. वीज कंपनीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करावा. आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थी असल्याने कंपनी आमच्यावर अन्याय करीत आहे. शहरी भागात मात्र असा प्रकार नाही. आम्ही ग्रामीण भागात राहतो, म्हणून चूक आहे काय? 
- सई पाटील, विद्यार्थिनी. 

Web Title: Electric load Shanding in Osmanabad