जुन्या नोटांच्या रूपात साडेबारा कोटींचा वीजबिल भरणा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

महावितरण आजही स्वीकारणार हजार, पाचशेच्या नोटा

लातूर - पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने लोक आता कर, पाणीपट्टी, वीजबिल भरण्यासाठी या नोटांचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत महावितरणच्या लातूर परिमंडळातील तीन जिल्ह्यांत वीज ग्राहकांनी साडेबारा कोटी रुपयांचा वीज भरणा केला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा वीज बिल भरणा ठरला आहे. 

महावितरण सोमवारी (ता. १४) रात्री बारा वाजेपर्यंत जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी वीज बिल भरणा करावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

जुन्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर राज्य शासनानेही महापालिकेचा कर, महावितरणचे बिल, पाणीपट्टी भरण्यासाठी हजार व पाचशेच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला. महावितरणच्या लातूर परिमंडळ कार्यालयाने ग्राहकांना वीज बिल भरण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी भरणा केला. यातून लातूर परिमंडळ कार्यालयांतर्गत असलेल्या लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यात वीज ग्राहकांनी तीन दिवसांत १२ कोटी ७८ लाख रुपये वीज बिल भरणा केला आहे. 

तीन दिवसांत असा झाला भरणा
११ नोव्हेंबरः नऊ कोटी २० लाख, 
१२ नोव्हेंबरः दोन कोटी ५२ लाख 
१३ नोव्हेंबरः एक कोटी सहा लाख

आज नोटा घेण्याचा शेवटचा दिवस
सोमवारी (ता. १४) जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महावितरणच्या वतीने सोमवारी रात्री उशिरापर्यंत वीज बिलापोटी जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. 

Web Title: electricity bill payment in the form of the old currency