esakal | जुने देयक अथवा पावतीवरून भरावे लागणार वीजबिल 
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

वीज ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर वीज देयकांची थकबाकी राहिली आहे. या स्थितीत वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्याकरिता वीज वितरण कंपनीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारपासून (ता.पाच) पाठपुरावा करण्यात येत होता.त्यानुसार शुक्रवारपासून वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. 

जुने देयक अथवा पावतीवरून भरावे लागणार वीजबिल 

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोनामुळे दोन महिन्यांपासून बंद असलेले तालुक्यातील ११ वीज बिल भरणा केंद्र शनिवारपासून (ता.१६) सुरू करण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी जुने वीज देयक अथवा भरणा केलेली पावती सोबत घेऊन या केंद्रावर वीज बिल भरणा करण्याचे आवाहन वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता एस. एस. रेकुळवाड यांनी केले आहे.

वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय अभियंत्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जवळपास दोन महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीकडून तालुक्यातील जवळपास २८ हजार ग्राहकांच्या वीज मीटरची रिडींग घेण्यात आली नाही. 

हेही वाचा कोरोनाच्या दहशतीने पुणे येथून आलेल्या ग्रामस्थांना पाणीही मिळेना

विजेचे प्रिंट देयक वाटप रखडले

या ग्राहकांना विजेचे प्रिंट देयके वाटप करण्यात आली नाही. संकटाच्या काळात ग्राहकांना त्यांच्या वीज मीटरचे रीडिंग व वीज बिल भरणा करण्याची ऑनलाइन व्यवस्था करण्यात आली होती. मात्र ग्राहकांनी याला फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येत आहे.

४२ ग्राहकांनी विजेचा केला भरणा

या दोन महिन्यात ग्राहकांकडे विजेची जवळपास दोन कोटी रुपयांची वसुली होणे बाकी असून यामध्ये एप्रिल महिन्यात ८९ ग्राहकांनी पंधरा लाख ६२ हजार ९०० रुपये ऑनलाइन भरणा केली. मे महिन्यामध्ये ४२ ग्राहकांनी एक लाख ७९ हजार ७९० रुपये ऑनलाइन वीज देयके भरणा केली. 

वीज भरणा केंद्र सुरू

त्यामुळे वीज ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर वीज देयकांची थकबाकी राहिली आहे. या स्थितीत वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्याकरिता वीज वितरण कंपनीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारपासून (ता.पाच) पाठपुरावा करण्यात येत होता. कंपनीच्या मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नियमाच्या अधीन राहून वीज भरणा केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. 

येथे क्लिक कराहिंगोलीत ८१ योद्ध्यांनी कोरोनाला हरविले

अकरा वीज भरणा केंद्रांचा समावेश

त्यामुळे तालुक्यातील कळमनुरी येथील तीन, आखाडा बाळापूर दोन, डोंगरकडा, जवळा पांचाळ व वारंगा फाटा येथील प्रत्येकी एक व आखाडा बाळापूर, कळमनुरी, डोंगरकडा याठिकाणी असलेल्या बुलडाणा अर्बन बँकेत वीज बिल भरणा केंद्र शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहेत. 


रक्कम समजण्यास मदत होणार 

ग्राहकांनी दोन महिन्यापूर्वी आलेले विजेचे प्रिंट देयक अथवा वीज बिल भरणा केलेली पावती सोबत घेऊन वीज बिल भरणा करावे, पावती किंवा जुन्या देयकावरील ग्राहक क्रमांकावरून त्यांनी वापरलेल्या विजेबाबत देयकाची रक्कम समजण्यास मदत होणार आहे. ग्राहकांनी आपल्याकडील वीज देयकाची थकबाकी भरून सहकार्य करावे. 
- एस. एस. रेकुळवाड, उपविभागीय अभियंता