चिकलठाण्यात दुसऱ्या दिवशीही विजेचा लपंडाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

औरंगाबाद - चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत सलग दुसऱ्या दिवशीही विजेचा लपंडाव सुरूच होता. सर्व्हिस सेक्‍टरमध्ये असलेल्या दुकानांची वीज रविवारी (ता. तीन) अर्धा दिवस गायब होती. 

शहरात असलेल्या चिकलठणा औद्योगिक वसाहतीत दुसऱ्या दिवशीही विजेचा लपंडाव सुरूच होता. औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या इंडस्ट्रियल फिडर दोनच्या अखत्यारीत असलेल्या कंपन्यांना तब्बल सहा तास वीज गेल्याने आपले उत्पादन रविवारीही बंद ठेवावे लागले. शनिवारी (ता. दोन) झालेल्या पावसाने चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत वीज गायब झाली होती. 

दुरुस्तीला वेळ लागल्यानंतर रविवारीही विजेचा हा लपंडाव सुरूच राहिला. रविवारी इंडस्ट्रियल फिडर दोनच्या अखत्यारीत असलेल्या कंपन्यांचा वीजपुरवठा सुमारे सहा तास बंद होता. एन-१ परिसरात असलेल्या सेवा क्षेत्रातील दुकाने आणि उद्योगांची वीज सुमारे साडेतीनदरम्यान परतल्याने या दिवशी कामावर परिणाम झाला.

पाण्याचा त्रास कायम 
चिकलठणा औद्योगिक वसाहती पाण्याची समस्या कायम असून, कृत्रिम पाणीटंचाईने कंपन्या त्रस्त झाल्या आहेत. येथे उद्योगांना नेहमीच कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. परिणामी, आवश्‍यक तेवढे पाणी मिळत नसल्याने उद्योजकांचा त्रास कायम आहे. त्यामुळे याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

रविवारी इंडस्ट्रियल फिडर दोनच्या अखत्यारीतील कंपन्यांना सुमारे सहा तास वीजपुरवठा मिळाला नाही. एन-१ भागातील सर्व्हिस कंपन्यांनाही वीज नव्हती. पाण्याचा त्रास कायम असून, कमी दाबाने होणारा पुरवठा त्रासदायक ठरतो आहे. 
- मनीष अग्रवाल (जनसंपर्क अधिकारी, मसिआ)

Web Title: electricity issue in chikalthana

टॅग्स