जालना : मध्यरात्री वीज गुल, अर्धे शहर अंधारात

उमेश वाघमारे
शनिवार, 6 एप्रिल 2019

शहरात ही दशा
औद्योगिकनगरी म्हणून ओळख असणाऱ्या जालना शहरात सलग दोन दिवसांपासून मध्यरात्री वीज गुल होत आहे. त्यात सबटेशन येथील दूरध्वनी ही उचलण्याची कोणी तसदी घेत नाही, ही स्थिती जालना शहरात आहे, त्यामुळे ग्रामीण भागात महावितरणची सेवा किती सुरळीत असेल याचा विचार न केलेला बरा.

जालना : एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच जालना शहराने चाळीशीचा पारा पार केला आहे. त्यामुळे नागरिकांचे उकाड्याने हाल होत आहेत.  त्यात मागील दोन दिवसांपासून तब्बल अर्ध्या शहराची वीज मध्यरात्रीच गुल होत आहे. परिणामी महावितरणच्या भोंगळ कारभाराने नागरिकांची झोप उडविली आहे.

मागील काही दिवसांपासून जालना शहराच्या तापमानाच्या पाऱ्याने  42 अंश सेल्सिअस ओलाडले  आहे. त्यामुळे दिवसभर उन्हाने आणि रात्री उकाड्या नागरिक  हैरान झाले आहेत.  त्यात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे  मध्यरात्रीच अर्ध्या शहराची वीज गुल होत आहे.   गुरुवारी (ता.4) शहरात काही काळ वार्यासह अवकाळी पाऊसाने हजेरी लावल्याने  होती. त्यामुळे रात्री आठ वाजल्यापासून मध्यरात्री दीड ते दोन वाजेपर्यंत अर्ध्या शहराची वीज गुल झाली  होती. त्यानंतर  शुक्रवारी (ता.5) पुन्हा  अंबड चौफुली, माऊलीनगर, यशवंतनगर, भाग्योदयनगर, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, नूतन वसाहत  आदी भागातील वीज मध्यरात्रीच गुल झाली. त्यामुळे अर्धे शहर अंधारात होते. परिणामी उकाड्यामुळे नागरिकांच्या झोपीच खोबर झालं.  सलग दोन दिवसांपासुन महावितरणच्या या भोंगळ कारभाराने नागरिकांच्या झोपा उडविल्या आहेत. मात्र महावितरणच्या अधिकार्यांसह कर्मचार्याना याचं काही घेनं देनं नसल्याचं चित्र आहे.

दुरध्वनी नावाला
महावितरणच्या 488 सबटेशनवरील दूरध्वनी केवळ नावापुरता असल्याचे चित्र आहे. येथील दूरध्वनी उचलण्याची साधी तसदीही महावितरणचे कर्मचारी घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे रात्री 488 सबटेशनवर महावितरणचे कर्मचारी असतात की नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चोरांना अप्रत्यक्ष  फायदा
महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा चोरांना अप्रत्यक्ष  फायदा होऊ शकतो. अंधाराचा फायदा घेत चोरटे घरफोडी सारखे गुन्हे करण्याची शक्यता अधिक आहे. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांना याचं काही घेनं देनं नसल्याचं चित्र आहे.

पाऊने तीन वाजता आली वीज
शुक्रवारी (ता.5) मध्यरात्री गुल झालेली वीज मध्यरात्री पाऊने तीन वाजन्याच्या दरम्यान आली. परिणामी अर्धे शहर तब्बल दोन तासा अंधारात होते.

शहरात ही दशा
औद्योगिकनगरी म्हणून ओळख असणाऱ्या जालना शहरात सलग दोन दिवसांपासून मध्यरात्री वीज गुल होत आहे. त्यात सबटेशन येथील दूरध्वनी ही उचलण्याची कोणी तसदी घेत नाही, ही स्थिती जालना शहरात आहे, त्यामुळे ग्रामीण भागात महावितरणची सेवा किती सुरळीत असेल याचा विचार न केलेला बरा.

Web Title: electricity issue in Jalna