सतावणारी वीज सुखाने नांदू लागली..!

- विकास गाढवे
रविवार, 15 जानेवारी 2017

लातूर - वीजबिल अवास्तव व चुकीचे येते म्हणून अनेक ग्राहक ते भरत नाहीत; मात्र तेच वीजबिल योग्य व कमी आल्यास ग्राहक त्याचा भरणा करतात. ही बाब ओळखून महावितरणचे मुरूड (ता. लातूर) येथील उपकार्यकारी अभियंता जितेंद्र राठोर यांनी ग्राहकांना वीजबचतीची सवय लावत वीजबिल दुरुस्तीची घरपोच सेवा दिली. यामुळे श्री. राठोर यांच्या कार्यकक्षेतील 48 गावांत ग्राहकांना सतावणारी वीज मागील दोन वर्षांपासून सुखाने नांदत आहे.

जून 2014 पासून श्री. राठोर यांनी मुरूड भागात वीजपुरवठा व वीजबचतीचे प्रयोग राबविले. रस्त्यावरील पारंपरिक पथदिव्यांमुळे विजेचे नुकसान सुरू होते. हे पथदिवे बदलण्यासाठी त्यांनी वीज उपकेंद्रापासून सुरवात केली. चार वीज केंद्रांतील पूर्वीचे पथदिवे बदलून कमी वीज लागणारे एलएडी दिवे बसविले. त्यानंतर अनेक गावांतील पारंपरिक पथदिवे काढून तिथे एलएडी दिवे बसविण्यासाठी त्यांनी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न केले. ग्रामपंचायतींनी 13 व्या वित्त आयोगाच्या निधीतून एलएडी पथदिवे बसवले. ग्राहकांनाही एलएडी दिव्यांसाठी प्रोत्साहित केले. ग्राहक चुकीच्या बिलांमुळे त्याचा भरणा करीत नव्हते. श्री. राठोर यांनी ग्राहकांच्या दारात कर्मचाऱ्यांना पाठवून बील दुरुस्तीची सेवा दिली. वीज चोरी रोखण्यासोबत नादुरुस्त व जुन्या यंत्रणेतून होणारी वीज हानी त्यांनी थांबविली. यामुळे वीजहानी कमी होऊन वीजबिल वसुलीत वाढ झाली. श्री. राठोर हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमाचे समुपदेशक व मार्गदर्शक आहे. त्यांच्याकडे प्रकल्पासाठी दहा विद्यार्थ्यांना त्यांनी वीजबचतीसाठी संशोधन करण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी शोधून काढलेले वीजबचतीचे मार्गही त्यांनी अवलंबले. यामुळे पूर्वी उपविभागात विजेच्या विक्रीतून होणारी साठ टक्के वसुली ऐंशी टक्के झाली. मुरूड, करकट्टा व गुंफावाडी या गावांमध्ये वीजहानी कमी करण्यासोबत वसुलीसाठी ग्राहकांची मानसिकता बदलली. यामुळे मागील दोन वर्षांपासून तीनही गावे भारनियमनमुक्त झाली आहेत.

नेमके काय केले
- यांत्रिक हानी टाळण्यासाठी दोनशे बॉक्‍स जुने कंडक्‍टर बदलले
- पारंपारिक पथदिवे बदलून वीज बचत केली
- अधिकारी व कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलून त्यांना नवी दिशा दिली
- वीजबिल दुरुस्तीसाठी ग्राहकांना घरपोच सेवा
- वीजबचत व वीजहानी टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी व लोकांचा सहभाग मिळविला

Web Title: electricity saving