वीजचोरी करणाऱ्या हॉटेल चालकास कैद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करणाऱ्यास सहा महिने कैद व साठ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी ठोठावली.

औरंगाबाद - मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करणाऱ्यास सहा महिने कैद व साठ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी ठोठावली.

आरोपी इर्शाद अहमद कुरेशी हा मध्यवर्ती बसस्थानक परिसरासमोर हॉटेल चालवत होता. 28 जुलै 2010 ला या हॉटेलमधील वीज मीटरची तपासणी महावितरणच्या पॉवर हाऊस शाखेचे कनिष्ठ अभियंता दीपक तुरे पाटील यांच्या पथकाने केली. मीटरमध्ये फेरफार करून इर्शादने 49 हजार 183 रुपयांची 5,408 युनिट वीजचोरी केल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.

त्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सुनावणीनंतर न्यायालयाने इर्शाद अहमद कुरेशी यास विद्युत कायद्याच्या कलम 135 मध्ये सहा महिने कैद व 50 हजार रुपये दंड व कलम 138 मध्ये सहा महिने कैद व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त एका महिन्याच्या कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे.

Web Title: Electricity Theft Hotel Owner Arrested Crime