नांदेड परिक्षेत्रातील अकरा पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या; तीन सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा समावेश

मंगेश शेवाळकर
शनिवार, 1 जून 2019

तीन सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह अकरा पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

हिंगोली ः जिल्ह्यातील तीन सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह अकरा पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदल्यांचे आदेश नांदेड परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंगल यांनी शुक्रवारी (ता.३१) दिले आहेत. 

नांदेड परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली करण्याबाबतच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांकडून विकल्प देखील मागविण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. 

यामध्ये हिंगोलीच्या गुन्हे शाखेतील विनायक लंबे यांची नांदेड येथे, तर सुभान केंद्रे यांची लातूर येथे बदली करण्यात आली आहे. शिवाय पोलिस उपनिरीक्षक मनीषा तायडे, राजू मोरे, सविता सपकाळे, नागोराव मोरे यांची नांदेड येथे बदली करण्यात आली आहे. तसेच उपनिरीक्षक सदानंद मेंडके, रुपाली कांबळे, सुप्रिया केंद्रे यांची परभणी आणि उपनिरीक्षक विश्वनाथ बोईनवाड, बालाजी तिप्पलवाड यांची लातूर येथे बदली करण्यात आली आहे. 

तसेच गोरेगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर आडे यांची नांदेड, तर हट्ट्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड, नर्सीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी येवते यांची परभणी येथे बदली करण्यात आली आहे. 

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात नियुक्ती झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांमध्ये नांदेडच्या प्रभा दासराव पुंडगे, रेखा शहारे, श्रीनिवास रोयलवार, परभणीचे शेख उस्मान शेख चाँद, अविनाश खंदारे यांचा समावेश आहे. पोलिस उपनिरीक्षकांमध्ये नांदेड येथील श्रीदेवी पाटील, मनोजकुमार पांडे, नागोराव रोडे, सदानंद वाघमारे, गजानन पाटील, कविता जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, प्रतिभा शेट्टे, तर लातूरच्या सचिन इंगेवाड यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven PSI transfers in Nanded region; Along with Three API