नकारात्मक विचार सोडा, हे करा...

प्रमोद चौधरी
Wednesday, 5 February 2020

सगळंच काही मनासारखं घडत नसते,जे काही आपल्या हातात नाही, घडून गेले आहे,याचे दुःख करीत न बसता  भविष्यात असे घडणार नाही, यासाठी काय करता येईल याचा शोध आणि बोध घेऊन काळजीपूर्वक, विचारपूर्वक कार्यशील राहिले पाहिजे. 

नांदेड : ‘‘चुका झाल्या, होऊ द्या असे धोरण कामाचे नाही. पुन्हा त्याच त्या चुका होणार नाहीत, याची काळज घेतली पाहिजे. कारण यशाच्या प्रक्रियेत, परिश्रमात चढउतार येतच असतात. एकदा यश मिळाले की, अपयश आले होते, याचा विसर होतो आणि विजयी निकालाचा गौरव होतो.

यशस्वी माणसांच्या अपयशाचा समाज अभ्यास करतो. यातूनही असंख्य माणसं प्रेरणा आणि बोध घेतात.  त्यामुळे अपयशाचा विचार करत न बसता विजय, ध्येयपूर्तीवर लक्षकेंद्रित करून तन-मन-धनाने प्रयत्न, उपाययोजना करत वाटचाल केल्यास नक्कीच यश मिळते. 

हे वाचा - शासनापेक्षा शाळा अवजड होतात तेव्हा...काय हेते ते वाचाच

पुन्हा मिळवता येते यश

नकारात्मक विचार करत न बसता उपाययोजना करत वाटचाल केल्यास नक्कीच फायदा होतो. होऊन गेले; तो ‘भूतकाळ’ असतो. उपाययोजना हा ‘वर्तमान’ असतो. निकाल हा ‘भविष्यकाळ’ असतो. उज्ज्वल भविष्यकाळ करण्यासाठी वर्तमानाचा सदुपयोग करून उपाययोजनावरच भर द्यावा लागतो. भूतकाळापासून बोध घेऊन वाटचाल केल्यास पुन्हा यश मिळवता येते.

यशाच्या दिशेने वाटचाल करावा

एकदा अपयश मिळाले आता त्या वाटेला नको म्हणणे घातक ठरते. परीक्षेत, कामात, निवडणुकीत अपयश मिळाल्यानंतर पुन्हा एकदा आत्मविश्वासाने यशाच्या दिशेने वाटचाल केलेल्या माणसांनी यश मिळवलेले आहे. याची असंख्य उदाहरणे आहेत. त्यांचा अभ्यास केल्यास, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन वाटचाल केल्यास मनुष्य अपयशाने कायमचा खचून जात नाही.

हेही वाचायलाच हवे - असा होता - असा नव्हता माझ्यानजरेतील अर्थसंकल्प

सकारात्मक विचारांची गरज

विजय अन् पराजय येतात अन् जातात. मनाला लावून घ्यायचं नसते. उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसते. पुन्हा एकदा यशासाठी सिध्द असे म्हणत वाटचाल करणे आवश्यक आणि उपकारक ठरते. नकारात्मक परिस्थितीत, नकारात्मक मनःस्थितीत नकारात्मक विचारांची पैदास जास्त होते, असे होऊ नये; यासाठी विशेष काळजी घेतली नाहीतर मानसिक त्रास आणि मानसिक आजार होतात. प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक विचार करून ध्येयपूर्तीसाठी आवश्यक त्या कामात मग्न झाले पाहिजे.

हे देखील वाचा आणि व्हिडिओ बघा Video: बुद्धांच्या जन्मभूमीत बुद्धांचे पुनरागमन : भदंत वोनेयुंग (दक्षिण कोरीया)

हिंमतीने वाटचाल आवश्यक                                                           हिंमतीने वाटचाल करता आली तर नक्कीच नकारात्मक विचार त्रास देऊ शकत नाहीत. यश मिळू शकते. मनुष्य जीवनात पुन्हा उभा राहू शकतो. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितले आहे ‘छोटे मन से कोई बडा नही होता, तुटे मन से कोई खडा नही होता’. अशा प्रेरणादायी सकारात्मक विचारांची पेरणी मनात करत वाटचाल करणारी माणसं बचेगे तो और भी लढेगे अशा हिमतीने मार्गक्रमण करतात. विजयाचा जन्म मनात होतो. विजयी मानसिकतेत जगलो तरच चांगले यश मिळवू शकतो. भिका-याच्या मानसिकतेत जगून कुणी राजा होतं नाही.

पराभवाचा स्वीकार करायला शिका   

Image may contain: Hanumant Bhopale, standing
डाॅ. हनुमंत भोपाळे, नांदेड

पराभवाला कधी कधी आपण जबाबदार असत नाही तर त्याचा स्वीकार करावा लागतो. अशावेळी गोंधळून न जाता संयम ठेवून वाटचाल केली पाहिजे. अनेकदा नको ते जीवनात येते. आपले ब्रेक आपल्या हातात असले तरी दुस-याचे ब्रेक आपल्या हातात नसतात. त्यामुळे पुढच्याची गाडी आपल्या अंगावर येऊ शकते आणि आपल्या जीवनाची घडी विस्कटून जाते.                                                                  - डाॅ. हनुमंत भोपाळे, समुपदेशक नांदेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emphasis Should Be Placed On Solutions Rather Than Negative Thoughts Nanded News