एसआरपीएफच्या जवानाला मारहाण करून लुटले

fighting
fighting

नांदेड : शहरातील चोरट्यांचे मनोधैर्य वाढत असून आता तर चक्क एका राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाला रस्त्यात अडवून लोखंडी रॉडने बेदम माराहण केली. एवढेच नाही तर त्यांच्या जवळील रोख 25 हजार रुपये जबरीने चोरून नेले. हा प्रकार  भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत पूर्णा रोडवर रविवारी (ता. 9) रात्री दहाच्या सुमारास घडला. 

शहराच्या पूर्णा रोडवर असलेल्या हरीओम पार्क अपार्टमेंट विशालनगर भागात एसआरपीएफचे जवान मारोती शेषेराव नवाडे हे आपल्या परिवारास रहातात. रविवारी (ता. 9) रात्री दहाच्या सुमारास ते आपली दुचाकी (एमएच 26-एन-8946) वरून पूर्णा रोड मार्गे घराकडे जात होते. विशालनगर भागात पोहचताच दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांना दगड फेकून मारला. यावेळी ते जाग्यावरच थांबले. लगेच या दोन्ही चोरट्यांनी त्यांना शिविगाळ करत डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले. त्यांच्या खिशातील नगदी 25 हजार रुपये जबरीने काढून घेऊन पोबारा केला.

जखमी जवानाने नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बुधवारी (ता. 12) भाग्यनगर ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसाच्या जवानाला अडवून बेदम मारहाण होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार एस. डी. सिरसाट हे करीत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com