औरंगाबादेतील रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अतिक्रमणधारक हळूहळू रस्ते गिळंकृत करत आहेत.

औरंगाबाद - शहरातील रस्त्यांना अतिक्रमणांचा विळखा पडत असून, सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट या एकाच सर्व्हिस रस्त्यावर तब्बल 27 अतिक्रमणे झाल्याचे समोर आले आहे. यातील सात जणांनी न्यायालयात धाव घेतली असल्याचे प्रशासनाने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अतिक्रमणधारक हळूहळू रस्ते गिळंकृत करत आहेत. या अतिक्रमणामुळे रस्त्यावर वारंवार वाहतुकीचा कोंडी होत आहे. जळगाव रोडवर एकाबाजूचा सर्व्हिस रस्ता मोकळा आहे तर दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत. उपमहापौर विजय औताडे यांनी सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट या सर्व्हिस रस्त्यावर अतिक्रमणांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने पाहणी करून 27 अतिक्रमणे असल्याची यादी जाहीर केली आहे. त्यातील सात प्रकरणे सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत. काही जणांनी हॉटेल, पानटपऱ्या, रसवंत्या थाटून अतिक्रमणे करण्यात आली आहेत.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Encroachment on Aurangabad road issue