महापालिका हटविणार शहागंजमधील मुदत संपलेल्या टपऱ्या, हातगाडे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

औरंगाबाद - भाडेकरार संपल्याने महापालिकेने शहागंज भागातील शंभर टपऱ्या हटविण्याचा निर्णय घेतला आहे. शहागंजसह सिटी चौक, रंगारगल्ली, चेलीपुरा आदी ठिकाणच्या रस्त्यांवरील हातगाड्यांविरोधातही मोहीम राबविण्याचे आदेशही महापौरांनी दिले आहेत. 

तत्कालीन नगरपपालिकेच्या कार्यकाळात शहागंज चौकात छोट्या व्यापाऱ्यांना 4 बाय 6 फूट आकाराचे लोखंडी टपऱ्यांचे शंभर गाळे लीजवर देण्यात आले होते. त्यांची मुदत संपून गेलेली असतानाही या गाळेधारकांनी आजूबाजूचा परिसरही व्यापला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी प्रशासनाने या करारनामा संपलेल्या शंभर टपऱ्या हटविण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. 24) महापौरांची भेट घेऊन रस्त्यांवरील हातगाड्यांची तक्रार केली. महापौरांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. हातगाडीवाल्यांनी फिरून व्यवसाय करणे अपेक्षित आहे; परंतु ते रस्त्यावर कायमस्वरूपी ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे आमच्या दुकानांच्या व्यवसायाला अडचणी येत आहेत; तसेच हातगाडीवाल्यांमुळे रस्तेही अरुंद बनले आहेत. यासाठी अडथळा ठरणाऱ्या हातगाडीवाल्यांना हटविण्यात यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. त्यावर महापौरांनी रस्त्यांवरील हातगाड्या हटविण्याची मोहीम तातडीने हाती घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले. या बैठकीला नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, नगरसेविका यशश्री बाखरिया, पोलिस निरीक्षक हेमंत कदम, मधुकर सावंत, व्यापारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

शिवसेनेचे महानगरप्रमुख जैस्वाल यांनी शहागंज ते सिटी चौक, गुलमंडी ते सिटी चौक; तसेच पैठणगेट आदी भागांत रस्त्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर हातगाड्या उभ्या करण्यात येत आहेत. मनपाने काही वर्षांपूर्वी हे रस्ते रुंद केले होते; परंतु रुंदीकरणानंतरही हातगाड्यांमुळे हे रस्ते अरुंदच बनले आहेत. म्हणून मनपाने या हातगाड्या हटवाव्यात, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. 

Web Title: encroachment removed from Municipal Corporation