दफनभूमीच्या रस्त्यावर अतिक्रमण; धारुर तहसिलमध्ये ठेवले प्रेत

Encroachment on the road of crematorium ground in dharur
Encroachment on the road of crematorium ground in dharur

किल्लेधारुर : येथील वीरशैव समाजाच्या दफनभुमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतीक्रमण झाल्यामुळे प्रेत न्यायला रस्ताच नसल्याने सोमवारी (ता. 4) सकाळी तहसील कार्यालयात प्रेत ठेवून आंदोलन करण्यात आले. ताबडतोब अतिक्रमण काढण्याची मागणी आंदोलकांनी केली.

वीरशैव दफनभुमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतीक्रमण झाल्याची तक्रार दोन महिन्यापुर्वीच केलेली आहे. त्याविषयावर नायब तहसीलदार सुहास हजारे यांच्यासोबत दोन बैठका झाल्या. तरीही त्यातून मार्ग निघाला नाही. रविवारी (ता. 3) सायंकाळी शहरातील जेष्ठ नागरीक जयश्री मारुती किनकर (वय 70) यांचे निधन झाले. त्यानंतर समाजाने तहसील व पोलीस ठाण्यात लेखी पत्र देवुन कार्यवाहीची मागणी केली. परंतु, कार्यवाही होत नसल्याचे पाहून समाजाने तहसील कार्यालयात प्रेत ठेवले. जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत तिथेच प्रेत ठेवून ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com