औरंगाबादेत अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

ऐतिहासिक सलीम अली सरोवर परिसरात झालेले अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना मंगळवारी (ता.16) घडली याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

औरंगाबाद :  ऐतिहासिक सलीम अली सरोवर परिसरात झालेले अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना मंगळवारी (ता.16) घडली याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

सलीम अली सरोवर परिसरात गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणांचा सपाटा सुरू आहे. याबाबत वारंवार तक्रारी होत असल्यामुळे तसेच सलीम अली सरोवराचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे महापालिकेच्या पथकाने मंगळवारी कारवाई सुरू केली असता, एकाने महापालिकेच्या पथकावर हल्ला केला. जेसीबीच्या काचा फोडण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली. हल्ला करणाऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर मोहीम पुन्हा सुरू झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment squad underwent a attack