हिंगोलीत लाच घेताना अभियंत्याला पकडले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जून 2019

जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी प्रभारी कार्यकारी अभियंत्यास पाच हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी (ता. 4) दुपारी पकडण्यात आले.

हिंगोली - येथील जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी प्रभारी कार्यकारी अभियंत्यास पाच हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी (ता. 4) दुपारी पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुका अंतर्गत जिल्हा परिषद शाळांच्या झालेल्या बांधकामाबाबत देखरेख ठेवून तयार केलेल्या मोजमाप पुस्तिकेवर व काम पूर्णत्वाच्या दाखल्यावर स्वाक्षरी करण्यासाठी कंत्राटी प्रभारी कार्यकारी अभियंता विजय अग्रवाल याने संबंधित कनिष्ठ अभियंत्याकडून पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. ही रक्‍कम आज देण्याचे ठरले होते. त्यानंतर संबंधित कनिष्ठ अभियंत्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: engineer was caught taking bribe in hingoli