अभियांत्रिकी प्रवेशाबाबत आज तापडियात मार्गदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

सोमवार ता. 9 जानेवारी, वेळ : दुपारी चार वाजता 
स्थळ : तापडिया नाट्यमंदिर, निराला बाजार, औरंगाबाद 
विद्यार्थी, पालकांसाठी प्रवेश विनामूल्य 
संपर्क : 9850049455, 9850044955 

औरंगाबाद - सकाळ विद्या आणि चेन्नईच्या एसआरएम विद्यापीठातर्फे अभियांत्रिकी क्षेत्रातील संधींबाबत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. 9) तापडिया नाट्यमंदिर निराला बाजार, औरंगाबाद येथे हे चर्चासत्र होणार आहे. अभियंता होण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरणार आहे. 

पाल्यांच्या अभियांत्रिकी प्रवेशाबाबत पालकांच्या मनात अनेक शंका असतात. विद्यार्थ्यांनाही काही प्रश्‍न सतावत असतात. कार्यशाळेमध्ये अगदी मूलभूत प्रश्‍नांपासून गुंतागुंतीच्या प्रश्‍नांपर्यंत सर्व प्रकारच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळणार आहेत. याशिवाय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भविष्यातील संधी, विद्यार्थ्यांच्या समस्या, विद्यापीठातर्फे दिली जाणारी स्कॉलरशिप, विद्यापीठातर्फे राबविण्यात येणारे प्लेसमेंट शिबिर, प्रवेश परीक्षा अशा प्रत्येक टप्प्यावरच्या प्रश्‍नांवर येथे चर्चा होणार आहे. या सर्व प्रश्‍नांवर उत्तरे मिळावीत, म्हणून "सकाळ'ने प्राध्यापक लीनस मार्टिन (विभागप्रमुख, ऑटोमोबाईल, एसआरएम विद्यापीठ, चेन्नई) या शिक्षण तज्ज्ञासोबत विशेष चर्चासत्राचे आयोजन केले आहे. याशिवाय अभियांत्रिकीची किचकट प्रवेश प्रक्रिया सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना आणि पालकांना समजावी, यासाठी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक गुरुकुल क्‍लासेसचे संचालक निर्मल बन्सल हे अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियाबाबत विशेष मार्गदर्शन करणार आहेत. 

Web Title: Engineering guidance regarding access