...अन्‌ चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - जुन्या नोटा जमा करण्याचा आणि पाचशे, दोन हजारांच्या नवीन नोटा मिळाल्याचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर मावत नव्हता. कित्येक जणांनी तर नवीन नोटांसह आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले, व्हॉट्‌सऍपवरून आपल्या मित्रांनाही त्यांचे छायाचित्र पाठविले. नवीन नोटांची रक्कम चार हजार असली तरी अनेकांच्या आनंदाला उधाण आले होते. नवीन नोटा तर अनेक जण पाहतच राहिले, तर काही जण नवीन नोटा आणल्या का, त्या कशा आहेत, एकदा दाखवा तरी अशी विचारणा करीत होते. 

व्यवहारात इतके दिवस शंभरच्या नोटांपेक्षा पाचशे, हजारांच्या नोटांना प्राधान्य देणारे सध्या शंभरच्या नोटा मिळविण्यासाठी खटाटोप करीत आहेत. दहा, वीस, पन्नास, शंभर रुपयांच्या नोटांची किमत काय असते हे मागील काही तासांत कळाले आहेत. आता सर्वच नवीन पाचशे, दोन हजारांच्या नोटा कशा मिळतील यासाठी प्रयत्न करीत आहेत. कित्येकांनी सकाळपासूनच बॅंकांसमोर रांगा लावल्या होत्या. कित्येक तासभर रांगेत उभे राहून चार हजारांच्या पाचशे, दोन हजारांचा नोटा मिळाल्याचा सर्वांनाच आनंद झाला होता. कित्येक जण तर या नोटांना खूप वेळपर्यंत पाहत राहिले. अनेक आपल्या मोबाईलमधून नोटांसोबत फोटो काढून ते फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर टाकले. काहींनी नवीन नोटांचे ट्विट केले. आज दिवसभर किती नोटा जमा केल्या. नवीन नोटा कशा आहेत याचीच मार्केटमध्ये चर्चा होती. 

Web Title: enjoy with new note