कोविडमुक्त महाराष्ट्र-प्रदूषणमुक्त दिवाळी : पर्यावरण राज्यमंत्री बनसोडे

युवराज धोतरे
Saturday, 7 November 2020

महाराष्ट्राचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य या विभागांचे राज्यमंत्री तथा मराठवाड्याचे सुपुत्र संजय बनसोडे यांनी राज्यातील जनतेला कोविडमुक्त महाराष्ट्र आणि प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा सल्ला दिला आहे. 

उदगीर (उस्मानाबाद) : सध्या आपण सर्वच कोविड-19 या विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करीत आहोत. या दिपावलीतही आपण सर्वांनी मास्क, साबणाने वारंवार हात स्वच्छ धुणे आणि दोन व्यक्तीत सुरक्षित अंतर पाळणे आवश्यक आहे. कोविड-19 ला हद्दपार करण्यासाठी या दिपावलीत फटाके न वाजवता दिपावली प्रदूषण मुक्त साजरी करण्याचा संदेश पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यानी दिला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोविड-19 विषाणूचा हल्ला हा माणसाच्या थेट फुफ्फसांवर होत असतो. त्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घेणे आवश्यक आहे. 'चला आपण संकल्प करुया प्रदूषण मुक्त दिपावलीचा, ध्यास घेऊया कोविड मुक्त महाराष्ट्राचा' हा संदेश पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिला आहे.
 ​दिपावली म्हणजे फटाक्यांची आतषबाजी असा फार मोठा सामाजिक गैरसमज आपल्या समाजामध्ये आहे. पण आपण सर्वांनी एक लक्षात घ्यायला हवे की, आज वातावरणातील प्रदूषणाचा स्तर वाढला आहे. शहरांमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे हवेच्या प्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यातच दिपावलीच्या फटाक्यांची आतषबाजी करुन हवेचे व ध्वनीचे प्रदूषण मोठया प्रमाणात वाढत असते. फटाके फोडल्यानंतर त्यातून घातक रासायनिक वायू हवेत मिसळतात.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

साधारणत: दिपावली दरम्यानच थंडीला सुरुवात झालेली असल्याकारणाने पहाटे शहरांमध्ये दाट धुके दिसून येते. हिवाळ्यात थंड हवा जमिनीच्या जवळच साठून राहत असल्याने फटाके वाजविल्यानंतर त्यातील घातक वायू आपल्या जवळच असतात आणि त्याचा मानवी शरीरावर अत्यंत विपरीत परिणाम होत असतो. हे सगळे टाळण्यासाठी आपण फटाकेमुक्त दिपावली साजरा करण्याचा संकल्प करुया. प्रदूषण मुक्त दिपावली साजरी केली जावी याकरता गेल्या काही वर्षापासून पर्यावरण विभाग म्हणजे अर्थातच आता नावात बदल झालेला पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यांनी प्रदूषण मुक्त दिपावली साजरी करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवित असते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या मोहिमेदरम्यान शालेय विद्यार्थ्यांना फटाक्यांच्या दुष्परिणामाबाबत माहिती देण्यात येते.  दरवर्षी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांची ध्वनीची पातळी मोजली जात. आणि जे फटाके विहीत मर्यादेपेक्षा जास्त असतात. त्याबाबतची माहीती पेस्को (नागपूर) पेट्रोलियम आणि एक्सप्लोजिव्ह विभाग यांना कळविली जाते. दरवर्षी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राज्यातील प्रमुख शहरातील 150 पेक्षा जास्त ठिकाणी दिपावली उत्सवात ध्वनीची पातळी मोजण्यात येते. गेल्या तीन वर्षात फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी झाल्याने ध्वनीच्या पातळीत घट होत आहे, असेही बनसोडे यांनी सांगीतले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Environment State Minister Sanjay Bansode conveye message celebrating Kovid-free and pollution-free Diwali