भूजल खाते माझ्याकडून जाता जाता वाचले - बबनराव लोणीकर

योगेश पायघन
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद : "भूजल खाते माझ्याकडुन जाता जाता वाचले आहे. हा विभाग अशी मागणी जलसंपदा मंत्री राम शिंदे यांना त्यांच्याकडे पाहिजे असल्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र, मी जोर लावल्याने तो प्रयत्न सफल होऊ शकला नाही," अशी स्पष्टोक्ती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली.

औरंगाबाद : "भूजल खाते माझ्याकडुन जाता जाता वाचले आहे. हा विभाग अशी मागणी जलसंपदा मंत्री राम शिंदे यांना त्यांच्याकडे पाहिजे असल्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र, मी जोर लावल्याने तो प्रयत्न सफल होऊ शकला नाही," अशी स्पष्टोक्ती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली.

भूजल अभियंता संघटनेचे 21 वे वार्षिक अधिवेशन जेएनईसी कॉलेजच्या आर्यभट्ट सभागृहात रविवारी (ता.4) दुपारी बारा वाजता पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, राहुल श्रीरामे, अध्यक्ष बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष हनुमंत ठोकळे, राजू बागडे, प्रभारी सह संचालक संजीव वानखेडे, रामदास आरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

वाळूपट्टांसाठी महसूल खात्याचे तहसीलदार, जलसंधारण खात्याची आणि कृषी विभागाची जलयुक्त शिवाराच्या कामांची जागा निश्चिती यांच्यासह भूजलाचा व पाण्याचा संबंध असलेली कामे भूजल विभागाच्या परवानगी शिवाय होऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत भुजल विभागाचे अधिकारी वाढवले आहेत. म्हणून अभियंत्यांनी या खात्याचे महत्व  आणि अधिकार समजून घ्या. असे सांगत महसूल, जलसंपदा व जलसंधारण, कृषी व ग्रामविकास विभागाच्या चाव्या भूजल विभागाकडे असल्याचे बबनराव लोणीकर यांनी स्पष्ठ केले.

बैलाला नाव तर अधिकाऱ्यांना का नको?
भूजल खात्यातील अभियंत्याला खोदन अभियंता हे नाव या पदाला का दिले. हे तीन वर्षात कळले नाही. बैलाला राजा, प्रधान नाव असते तर अधिकाऱ्यांनाही सन्मानाचे नाव असायला पाहिजे ते बदलण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन लवकरच बैठक बोलवू व भूजल संघटनेच्या अभियंत्यांच्या समस्या मार्गी लावू असे आश्वासन मंत्री लोणीकर यांनी  दिले. 

मेडचा सौर पंप प्रकल्प भूजलकडे 
राज्यातील पेयजल योजना सौरऊर्जावर चालवण्यासाठी सौर पंपाची 8 हजार कोटींची योजना राबवण्यात येणार आहे. ती योजना भूजल विभागाच्या मार्फत राबवावी अशी मागणी अधिवेशनात करण्यात आली . त्याचा धागा पकडत यासंबंधी केंद्रीय मंत्री नितीन नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू असे सांगत हे काम भूजलला मिळावे यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन लोणीकर यांनी दिले.

Web Title: esakal marathi news babanrao lonikar news