नांदेड जिल्ह्यात वीज पडून  दोघांचा मृत्यू; तीन जखमी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

दहा ऑक्‍टोबरला चैनपूर येथे मल्लिकार्जुन बरगे (वय 19) याचा वीज पडून मृत्यू झाला होता, तर कावळगाव येथेही याच दिवशी वीज कोसळून सात मेंढ्या दगावल्या होत्या. तालुक्‍यात सध्या रब्बीपूर्व हंगामातील कामाला वेग आला असून, वीज पडण्याच्या घटना घडत आहेत. ढगाळ वातावरण तयार होताच शेतकऱ्यांनी सुरक्षितस्थळी जावे, काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार महादेव किरवले यांनी केले आहे. 

नांदेड : नांदेड जिल्ह्यात शनिवारी (ता. 14) दोन घटनांत वीज पडून दोनजण ठार झाले, तर तीनजण जखमी झाले. मृतांत दहावीच्या विद्यार्थ्याचाही समावेश आहे. 
देगलूर तालुक्‍यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी विजांच्या कडकडाटासह काही भागात पाऊस झाला. वन्नाळी (ता. देगलूर) येथे वीज कोसळल्याने शिवशंकर माध्यमिक विद्यालयात दहावीमध्ये शिक्षण घेत असलेला तानाजी शिवाजी पाटील (वय 15) याचा मृत्यू झाला. वैरण आणण्यासाठी गावानजीकच्या शेतात तो गेला असता ही दुर्घटना घडली. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तहसीलदार महादेव किरवले यांनी या घटनेला दुजोरा दिला. दहा ऑक्‍टोबरला चैनपूर येथे मल्लिकार्जुन बरगे (वय 19) याचा वीज पडून मृत्यू झाला होता, तर कावळगाव येथेही याच दिवशी वीज कोसळून सात मेंढ्या दगावल्या होत्या. तालुक्‍यात सध्या रब्बीपूर्व हंगामातील कामाला वेग आला असून, वीज पडण्याच्या घटना घडत आहेत. ढगाळ वातावरण तयार होताच शेतकऱ्यांनी सुरक्षितस्थळी जावे, काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार महादेव किरवले यांनी केले आहे. 

कंधार तालुक्‍यात एक ठार 
कंधार तालुक्‍यात गोगधरी येथे दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. गोगधरी शिवारात वीज कोसळून एकजण जागीच ठार झाला तर तीन गंभीर जखमी झाले. यातील दोघाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. आनंद मारोती बोईनवाड (वय 50), पद्मीनबाई आनंद बोईनवाड (45), दत्ता तुकाराम हिवराळे (60), सत्यभामा दत्ता हिवराळे (55) या शेतात काम करीत असताना विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. आश्रयासाठी चौघे झाडाखाली थांबले असता याच झाडावर वीज कोसळून आनंद बोईनवाड जागीच ठार झाले. उर्वरित तिघे जखमी झाले. त्यापैकी पद्मीनबाई बोईनवाड, दत्ता हिवराळे यांना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. 
 

Web Title: esakal news 2 deaths in nanded

टॅग्स