शोकाकुल वातावरणात जवानावर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

मष्णेरवाडी येथील रामनाथ माधव हाके हे दोन वर्षापुर्वी सैन्य दलात दाखल झाले होते, सध्या भारत चिन सिमारेषेवरील माॅगपांग येथे कार्यरत होते. जमिनीपासून १८ हजार फुट उंचीवर असलेल्या नथुला जवळील टेकडीवर कर्तव्यावर असताना ६ आॅगस्ट रोजी आॅक्सीजन कमी पडल्यामुळे मेंदुत रक्तस्त्राव झाला होता.

लातूर- मष्णेरवाडी (ता.चाकूर) येथील सैन्य दलातील जवान रामनाथ माधव हाके (वय २४ वर्षे) हे भारत - चीन सिमारेषेवर नथुला येथे कर्तव्य बजावत असताना ऑक्सीजन कमी पडल्यामुळे मेंदूत रक्तस्राव होवून उपचारा दरम्यान शहीद झाले. त्यांच्यावर रविवारी (ता.२७) सकाळी शोकाकुल वातावरणात शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  

मष्णेरवाडी येथील रामनाथ माधव हाके हे दोन वर्षापुर्वी सैन्य दलात दाखल झाले होते, सध्या भारत चिन सिमारेषेवरील माॅगपांग येथे कार्यरत होते. जमिनीपासून १८ हजार फुट उंचीवर असलेल्या नथुला जवळील टेकडीवर कर्तव्यावर असताना ६ आॅगस्ट रोजी आॅक्सीजन कमी पडल्यामुळे मेंदुत रक्तस्त्राव झाला होता. पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा येथील सैन्य दलाच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता.२५) पहाटे त्यांचा मृत्यु झाला. रविवारी  सकाळी त्यांच्यावर  शासकीय  इतमामात  अंत्यसंस्कार  करण्यात  आले  यावेळी  लोकप्रतिनीधी, अधिकारी, ग्रामस्थ मोठ्यासंख्येने  उपस्थित  होते.   

Web Title: esakal news latur news shahid jawan

टॅग्स