नांदेड- बिलोली जवळ स्कोडा व स्कॉर्पीओचा अपघात ; तीन जण ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

सिंगापूर दौरा आटपून नांदेडचे व्यापारी हैदराबाद विमानतळावरून कारने (एमएच २६-बीसी-८०००) नांदेडला निघाले होते. बिलोली शहरापासून बोधन मार्गावर आल्यानंतर कार चालकाचे झोपेमुळे गाडीवरील नियंत्रण गेले कार बिलोलीहून हैदराबादकडे निघालेल्या जीपवर (एमएच २६-एके-०१८०) जाऊन धडकली.

नांदेड : हैदराबाद विमानतळावरून नांदेडकडे जाण्याऱ्या व्यापाऱ्याच्या कारला बिलोलीजवळ पहाटे 5.30 च्या सुमारास भीषण अपघात झाला. यात दोन्ही वाहने समोरासमोर धडकल्याने कारमधील नांदेडचे 2 व्यापारी व जीपमधील 1 जण जागीच ठार झाला.

सिंगापूर दौरा आटपून नांदेडचे व्यापारी हैदराबाद विमानतळावरून कारने (एमएच २६-बीसी-८०००) नांदेडला निघाले होते. बिलोली शहरापासून बोधन मार्गावर आल्यानंतर कार चालकाचे झोपेमुळे गाडीवरील नियंत्रण गेले कार बिलोलीहून हैदराबादकडे निघालेल्या स्कॉर्पीओवर (एमएच २६-एके-०१८०) जाऊन धडकली. यात स्कॉर्पीओ गाडीतील भगवान प्रचंड (४०) व कारमधील रवींद्र गुरुपवार (३४), उमेश जांगीड (३५) जागीच ठार झाले. रविंद्र व उमेश हे नांदेड येथील सिमेंटचे व्यापारी आहेत.

अपघातात कारचालक राजपाल ठक्कर व सुदर्शन पाटील, स्कॉर्पीओमधील मुन्ना पोबाडे व ज्ञानेश्वर गुडमे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरु आहेत.

Web Title: esakal news sakal news nanded news accident news