ईएसआयसीचे रुग्णालय कॉर्पोरेशनकडे सोपवा - प्रशांत चौधरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

औरंगाबाद - पश्‍चिम बंगालसह इतर राज्यांत ईएसआयसीची रुग्णालये ईएसआयसी कॉपोरेशनच्या माध्यमातून चालविण्यात येत आहेत. त्यामुळे ती सुव्यवस्थित सुरू आहेत. त्या तुलनेत औरंगाबादेत ईएसआयसीच्या रुग्णालयात कुठल्याच सुविधा नाहीत. यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाकडून हे रुग्णालय ईएसआयसी कॉपोरेशनकडे देण्यात यावे, अशी मागणी ईएसआयसीचे केंद्रीय सदस्य प्रशांत एन. चौधरी यांनी केली. औरंगाबादेतील रुग्णालयाचे वाईट अनुभव घेऊन जात असल्याचे चौधरी यांनी गुरुवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्यात ईएसआयसीच्या रुग्णालयांची अवस्था खूपच वाईट आहे. सुविधा नसल्यामुळे कामगारांचा रुग्णालयावरचा विश्‍वास उडत चालला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात १०० खाटांचे रुग्णालय आहे; मात्र केवळ दहा ते बाराच रुग्ण येथे उपचार घेतात. रुग्णालयात सध्या २३५ पदांपैकी ८७ पदे भरण्यात आली असून, १४८ पदे रिक्‍त आहेत. यामध्ये ‘ए’ ग्रेडची १४ पदे रिक्‍त, ‘बी’ ग्रेडची-तीन, ‘सी’-ग्रेडची ५१,  ‘डी’ ग्रेडची ७९ पदे रिक्‍त आहेत. यामुळे रुग्णांना उपचार व्यवस्थित मिळत नाहीत. रुग्णालयाच्या इमारती चांगल्या आहेत, मात्र सुविधा नाहीत. जिल्ह्यात सहा डिस्पेन्सरी आहेत; मात्र त्यांचीही वाईट अवस्था आहे. मॉडर्न डिस्पेन्सरी वाळूजला असून, तेथे जनरल मेडिकल ऑफिसरची तीन पदे रिक्‍त आहेत. वाळूज येथील महाराणा प्रताप चौकातील डिस्पेन्सरीची मोठी दुरवस्था आहे. यासंदर्भात मुंबईत होणाऱ्या बैठकीत विभागीय संचालक संजयकुमार सिन्हा यांच्यासमोर रुग्णालयांची स्थिती मांडणार आहे. येथील रिक्‍तपदे भरण्यासाठी आंदोलन उभे करू, असेही श्री. चौधरी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस भारतीय ट्रेड युनियन केंद्राचे औरंगाबाद अध्यक्ष ॲड. उद्धव भवलकर, सरचिटणीस लक्ष्मण साक्रुडकर, बसवराज पटणे, दीपक आहिरे, मंगल ठोंबरे, रमेश हाके उपस्थित होते.

चार लाख कामगार, साठ कोटींची कपात 
जिल्ह्यात चार लाखांहून अधिक कामगार आहेत. यांच्या कंपनीकडून ६० कोटी रुपयांहून अधिक ईएसअायसीकडे पैसे कपात होतात; मात्र त्या तुलनेत कामगारांना वैद्यकीय सुविधा मिळतच नाहीत.

Web Title: ESIC hospital transfer to Corporation