नपुंसक असतानाही केले लग्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

नपुंसक असतानाही ही बाब समाजात प्रतिष्ठा राखण्यासाठी पत्नी व तिच्या माहेरच्यांपासून लग्नाआधी लपवून ठेवली. त्यानंतर लग्न करून आर्थिक व मानसिक हानी पोचविल्याची तक्रार पत्नीने दिली. याप्रकरणी पतीसह आठजणांविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात २३ सप्टेंबरला गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

औरंगाबाद - नपुंसक असतानाही ही बाब समाजात प्रतिष्ठा राखण्यासाठी पत्नी व तिच्या माहेरच्यांपासून लग्नाआधी लपवून ठेवली. त्यानंतर लग्न करून आर्थिक व मानसिक हानी पोचविल्याची तक्रार पत्नीने दिली. याप्रकरणी पतीसह आठजणांविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात २३ सप्टेंबरला गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पंचवीसवर्षीय विवाहितेने तक्रार दिली. त्यानुसार त्यांचा भोकरदन तालुक्‍यातील एका तरुणाशी २०१७ मध्ये विवाह झाला. विवाहानंतर कट कारस्थान रचून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी व समाजात प्रतिष्ठा राखण्यासाठी पती नपुंसक असल्याची माहिती लपवून ठेवली. पती शारीरिक संबंध ठेवण्यास समर्थ नसतानाही ही बाब उघड केली नाही. पती व कुटुंबातील इतर सदस्यांनी मानसिक व आर्थिक हानी पोचविली. विवाहितेला माहेरच्यांनी लग्नात दिलेले हुंड्यापोटीचे सर्व साहित्य हडपून आठ ते दहा लाखांच्या खर्चास पती व त्याचे कुटुंबीय कारणीभूत ठरले. विवाहितेला वाळीत टाकले. अशा तक्रारीवर न्यायालयाच्या आदेशानुसार जिन्सी ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eunuch Cheating Marriage Crime