मेल्यानंतरही तिने उचलले निवृत्ती वेतन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

परभणी : परभणी शहरातील ग्रॅन्ड कॉर्नर परिसरात राहणाऱ्या एका मृत महिलेच्या नावावर बनावट हयातपत्र तयार करुन जवळपास दहा वर्षे निवृत्तीवेतन दरमहा उचलल्याप्रकरणी बँक शाखा व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून आरोपी ८० वर्षीय महिला आणि एका  दुसऱ्या व्यक्ती विरोधात नवा  मोंढा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा बुधवारी (ता.१३) दाखल झाला आहे.

परभणी : परभणी शहरातील ग्रॅन्ड कॉर्नर परिसरात राहणाऱ्या एका मृत महिलेच्या नावावर बनावट हयातपत्र तयार करुन जवळपास दहा वर्षे निवृत्तीवेतन दरमहा उचलल्याप्रकरणी बँक शाखा व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून आरोपी ८० वर्षीय महिला आणि एका  दुसऱ्या व्यक्ती विरोधात नवा  मोंढा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा बुधवारी (ता.१३) दाखल झाला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर मृताच्या पत्नीस दरमहा निवृत्तीवेतन मिळत होते. वसमत रोडवरील युनियन बँक शाखेत निवृत्ती वेतनधारकाचे खाते होते. निवृत्तीवेतन धारक बरकुतनिसा आवाज बिन अहेमद या ता. ३० एप्रिल २००८ रोजी मृत झाल्या. त्यानंतर महेमुद बीन आवाज बामर, बद्रुनिसा बेगम मो. बिन चाऊस वय ८० वर्षे (दोन्ही रा. परभणी) यांनी संगनमत करून मृत बरकुतनिसा यांचे खोटे आणि बनावट हयातपत्र तयार करून मृत या जिवंत आहेत, असे दाखवून २००८ ते मार्च २०१८ पर्यंत दरमहा बँकेत जाऊन निवृत्ती वेतन उचलले. आणि  शासनाची सहा लाख १५ हजार ६२७ रुपयांची फसवणुक केली.

 सदर प्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक कुलदिपसिंग चिंतराम बांगड यांच्या फिर्यादिवरून महेमुद बिन आवाज बामर, बद्रुनिसा बेगम मो. बिन चाऊस यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास  फोजदर सुनिल पल्लेवाड करत आहेत. 

हे ही वाचा

 दोन वर्षात ४००  मोबाईलची चोरी
मानवत : मानवत (जि.परभणी) शहरातील आठवडे बाजारात मोबाईल चोरटे सक्रीय असून प्रत्येक बाजारच्या दिवशी चार ते पाच मोबाईल चोरी होत आहेत. दोन वर्षात जवळपास ४०० मोबाईलची चोरी झाले असून पोलिस प्रशासनाला चोरट्यांच्या छडा लावण्यात यश आलेले नाही. बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना आपले महागडे मोबाईल गमवावे लागत आहेत.

शहरातील शिवाजीनगर रस्त्यावर दर सोमवारी आठवडे बाजार भरतो. शहरासह तालुक्यातील ५३ गावांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने बाजारात खरेदी करण्यासाठी येत असतात. भर रस्त्यात भरत असलेल्या आठवडे बाजारात गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन मागील दोन वर्षांपासून आठवडे बाजारात मोबाईल चोरटे सक्रीय झाले आहेत. दर बाजारच्या दिवशी चार ते पाच मोबाईल हमखास चोरीला जातात. बाजारातून मागील दोन वर्षांत तब्बल ३०० ते ४०० मोबाईल चोरीला गेल्याचे समजते.

 अनेक नागरिक पोलिस स्टेशनला तक्रार देण्याचे टाळतात. पोलिस प्रशासनाकडून तक्रारअर्ज दाखल करून घेण्याचा सोपास्कार पार पाडला जातो. परंतु, प्रत्यक्षात तपास कार्यात चोरटे मात्र, सापडत नाहीत. यामुळे त्रस्त झालेले नागरिक आठवडे बाजारात मोबाईल घेऊन जाण्यास टाळत आहेत. पोलिस प्रशासनाकडे यासाठी स्वातंत्र्य सायबर विभाग आहे. तरीदेखील मोबाईल चोरट्यांचा शोध लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

महिन्याला दोन लाखांचे मोबाईल लंपास
मानवतचा आठवडे बाजार म्हणजे मोबाईल चोरी असेच समीकरण झाले आहे. प्रत्येक बाजारच्या दिवशी चार ते पाच मोबाईल चोरीच्या घटना हमखास घडतात. साधारणपणे एका मोबाईलची किंमत दहा ते बारा हजारांच्या आसपास असते. शहरातून महिन्याला जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे मोबाईल चोरीला जात आहेत.
....
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even after she died, she raised her pension ...