मराठवाड्यातील मनीषाकडून एव्हरेस्ट सर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

औरंगाबाद - गतवर्षीची हुलकावणी... माघारी फिरून नव्याने केलेली सगळीच तयारी... पुनश्‍च हरिओम करीत पुन्हा आखलेली माउंट एव्हरेस्ट सर करण्याची मोहीम औरंगाबादकर प्रा. मनीषा वाघमारेने सोमवारी (ता. 21) सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी फत्ते केली. एव्हरेस्ट मोहीम फत्ते करणारी मनीषा ही मराठवाड्यातील पहिली महिला ठरली आहे.

प्रकृती ठणठणीत, तयारी जबरदस्त असताना वर्ष 2017 मध्ये आखलेली माउंट एव्हरेस्टची मोहीम निसर्गाच्या अवकृपेने अर्धवट सोडून मनीषा माघारी फिरली होती. त्यानंतरही इंडियन कॅडेट फोर्सची स्वयंसेवक आणि महिला महाविद्यालयाची शारीरिक शिक्षण विभाग संचालक असलेल्या मनीषाने एव्हरेस्ट परिसरातील शिखरांवर आपला सराव सुरू ठेवला होता. गुरुवारी (ता. 17) ती एव्हरेस्ट बेस कॅम्प सोडून कॅम्प एककडे सरकली. त्यानंतर कॅम्प एक, कॅम्प दोन, कॅम्प तीन, चार साउथकोलमार्गे ती माउंट एव्हरेस्टच्या शिखर माथ्यावर (8848 मीटर) पोचली. सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी तिने समिट केल्याची माहिती आयसीएफचे जगदीश खैरनार यांनी दिली. त्यानंतर ती माघारी फिरली असून, तिचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

Web Title: everest mountain manisha waghmare success