हरित औरंगाबादसाठी सर्वानी सक्रीय सहभाग घ्यावा - हरिभाऊ बागडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्षलागवड या महत्वाकांक्षी मोहिमेव्दारा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार आहे. त्या अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यासाठी ठरवून देण्यात आलेले 44.44 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट 100 टक्के साध्य करत हरित औरंगाबादसाठी प्रशासन, संस्था, संघटना आणि नागरिक या सर्वांनी वृक्षलागवड मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (ता.1) केले.

औरंगाबाद - राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्षलागवड या महत्वाकांक्षी मोहिमेव्दारा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार आहे. त्या अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यासाठी ठरवून देण्यात आलेले 44.44 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट 100 टक्के साध्य करत हरित औरंगाबादसाठी प्रशासन, संस्था, संघटना आणि नागरिक या सर्वांनी वृक्षलागवड मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (ता.1) केले.

महसूल व वनविभाग, तहसिल कार्यालय व पंचायत समिती, फुलंब्री यांच्या संयुक्त विद्यमाने तहसिल कार्यालय, फुलंब्री येथे वृक्षलागवड कार्यक्रमाचे आयोजन हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती विनायक मेटे, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसिलदार संगिता चव्हाण, माजी मंत्री नामदेव गाडेकर यांच्यासह जिल्हा परिषद,पंचायत समिती पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

हरिभाऊ बागडे यावेळी म्हणाले की, राज्याचे 13 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून आपल्याला जिल्ह्यासाठी 44.44 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे. त्यादृष्टीने सर्व शासकीय जमिनींवर झाडे लावली पाहिजेत. त्या सोबतच, शेताच्या बांधावर, रस्त्याच्या दुतर्फा गायरान जमिनी, शाळा,महाविद्यालये, शासकीय कार्यालयांच्या आवारात, गृहनिर्माण सोसायट्यांचा परिसर या सर्व ठिकाणी मोठया संख्येने झाडे लावली पाहिजे. गावाच्या लोकसंख्येइतकी झाडे लावण्याचा ध्यास घेऊन यंत्रणा व ग्रामस्थ या दोघांनी परस्पर सहकार्याने वृक्षलागवड मोहिम यशस्वी करावी, कारण वृक्ष संगोपन ही काळाची गरज असून आपल्या जगण्यासाठी ऑक्सिजन हा घटक सर्वात महत्वाचा आहे, ज्याचा मुख्य स्त्रोत झाडे आहे.

Web Title: Everyone should actively participate in gereen Aurangabad says Haribhau Bagade