माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर यांचे निधन

Ex MLA Bapurao Patil Passed away
Ex MLA Bapurao Patil Passed away

हदगाव (जि. नांदेड) : हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर यांचे सोमवार (ता. 4) सकाळी 9 वाजता आश्विनी हॉस्पिटल, नांदेड येथे दुःखद निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.

माजी आमदार आष्टीकर हे शिवसेनेचे विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे वडील होत. आष्टीकर हे हदगाव पंचायत समितीचे 17 वर्ष सभापती होते, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व वसंत सहकारी साखर कारखाना म. पोफाळी चे चेअरमन होते. ते सतत 10 वर्ष हदगाव मतदारसंघाचे आमदार होते. हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील विशेषतः ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षणाची गैरसोय होऊ नये, याकरिता त्यांनी विद्यार्थ्यांकरिता शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने हदगाव येथे हदगाव तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची 1990 या वर्षात स्थापना करून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यवस्था करून दिली.

हदगाव येथे श्री दत्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासह हिमायतनगर, हरडफ, तामसा आदी गावांमध्ये त्यांनी शाळा, महाविद्यालय उघडत ग्रामीण भागातील विद्यारथ्यांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली. राजकारणातील दुरदृष्टी नेते म्हणून ते गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत त्यांची ओळख होती.

अतिशय मनमिळाऊ आणि स्वपक्षीयांसह विरोधी पक्षातील नेते, कार्यकर्ते यांच्याशी ते जिव्हाळ्याचे संबंध जोपासून होते. वयाच्या नववदीतही ते कालपर्यंत ते आपल्या आष्टी (ता. हदगाव) या गावाकडील शेताकडे जात असत. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी कधीच आरामदायी जीवन न जगता सतत कामात आणि समाजसेवेत त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार (ता. 5) सकाळी 11 वाजता आष्टी (ता. हदगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com