अडचणी व समस्या सोडविण्यासाठी माजी सैनिक कार्यालय सज्ज : ब्रिगेडियर डी. के. पत्रा

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 14 जून 2018

नांदेड  : वीर नारी व माजी सैनिक तसेच शहीद सैनिकांच्या कुंटूबियांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा माजी सैनिक कार्यालय सज्ज आहे. तसेच आपल्या संकटकाळी आम्ही नक्कीच धावुन येउ असा विश्वास ब्रिगेडियर डी. के. पत्रा यांनी दिला. 

नांदेड  : वीर नारी व माजी सैनिक तसेच शहीद सैनिकांच्या कुंटूबियांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा माजी सैनिक कार्यालय सज्ज आहे. तसेच आपल्या संकटकाळी आम्ही नक्कीच धावुन येउ असा विश्वास ब्रिगेडियर डी. के. पत्रा यांनी दिला. 

स्टेशन कमांडर औरंगाबादचे डी. के. पत्रा हे बुधवारी (ता. १३) रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत माजी सैनिक कल्याण कार्यालयात माजी सैनिक, वीर पत्नी, शहिदांचे कुटूंबिय यांची बैठक आयोजीत कलेली होती. यावेळी त्यांनी माजी सैनिकांच्या अडचणी जाणून घेतल्या यामधे प्रमुख्याने माजी सैनिकांच्या जागेवर अतिक्रमण करण्याचं प्रकरणे होती . तसेंच माजी सैनिक रूग्णालयात नवीन कार्ड बनविणेसाठी कार्यवाही करावी. तसेच महत्वाचे नांदेडची कॅन्टीन लवकर सुरु करावी अशी मागणी माजी सैनिकांनी केली. यावर कमांडर ब्रिगेडीयर पत्रा यांनी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीनंतर श्री. पत्रा यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. माजी सैनिकांचे प्रकरणे लवकर निकाली काढावे यासाठी विनंती केली. तसेच त्यांच्या मालमत्तावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे ते काढून देऊन माजी सैनिकांना सहकार्य करावे असेही त्यांनी जिल्हाधिकराऱ्यांना सांगितले.

Web Title: Ex-servicemen office ready to solve problems said brig d k patra