परीक्षेत कॉपी नेण्यास मनाई केल्याने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

परीक्षेत कॉपी नेण्यास मनाई केल्याने विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याची धमकी देत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना खोकडपुरा येथील विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात मंगळवारी (ता. 24) दुपारी घडली.

औरंगाबाद : परीक्षेत कॉपी नेण्यास मनाई केल्याने विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याची धमकी देत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना खोकडपुरा येथील विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात मंगळवारी (ता. 24) दुपारी घडली.

परीक्षेसाठी कॉपी नेण्यास मनाई केल्यानंतर विद्यार्थ्याने महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून मारहाण केल्यानंतर इमारतीवरून उडी मारण्याची धमकी देत गोंधळ घातला. सतीश राजू वाघमारे (28:, रा. कांचनवाडी) असे आत्महत्येची धमकी देणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती क्रांतीचौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी दिली.

Web Title: Exam Copy Student Warn to Suicide

टॅग्स