विद्यापीठाच्या काही परीक्षांच्या तारखांत बदल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

नवीन नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एमए, एमसीए, एमएसडब्लू, एमएस्सी (सीएम), एमएस्सी (जनरल), एमएस्सी (एसई), एमएस्सी (सॅन), एमजे, एमएड, एमपीएड, एमलिब या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा 11 एप्रिलऐवजी 20 एप्रिलपासून सुरू होतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे यांनी कळविले आहे.

विद्यापीठाच्या एम.ए., एम.सी.ए., एम.एस.डब्लू., एम.एस्सी.(सी.एम.), एम.एस्सी.(जनरल), एम.एस्सी.(एस.ई.), एम.एस्सी.(सॅन), एम.जे., एम.एड., एम.पी.एड., एम.लिब. या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा 11 एप्रिलपासून सुरू होणार आहेत, असे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आता 20 एप्रिलपासून सुरू होतील. तसेच उर्वरित अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या तारखेत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच म्हणजेच 11 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. तसेच एम.एस्सी. अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा 10 ते 19 एप्रिल यादरम्यान घेण्याचे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले असून विद्यार्थ्यांची नेमलिस्ट विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध असून सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षार्थींचे प्रवेशपत्र संबंधित महाविद्यालयास पाठविण्यात आले आहेत, असेही विद्यापीठाने कळविले आहे.

Web Title: exam date changes in university