बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीटवर वेळापत्रकही 

Exam hall ticket with time table
Exam hall ticket with time table

जालना - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा अभिनव निर्णय घेतला आहे. यंदाच्या बारावी परीक्षेच्या हॉलतिकीटवर विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक देण्यात आले आहे. 

पुढील फेब्रुवारी महिन्यात बारावी लेखी परीक्षांना सुरवात होणार आहे. 
राज्य मंडळ पुणे यांच्या नियोजन व मार्गदर्शनाने राज्यातील विभागीय परीक्षा मंडळामार्फत परीक्षेचे नियोजन करण्यात येते. बारावीच्या लेखी परीक्षा ता. 18 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. पुढील आठवड्यात विज्ञान प्रात्यक्षिकासह भाषा विषयाच्या तोंडी परीक्षा सुरू होतील. परीक्षा केंद्रनिहाय विद्यार्थी बैठक क्रमांकानुसार नियोजन करण्यात आले आहे.

राज्य मंडळाने ऑनलाइन परीक्षा आवेदनपत्र भरणे प्रक्रिया सुरू केल्याने आता मंडळाने विद्यार्थी प्रवेशपत्र (हॉलतिकीट) छपाई करून देणे बंद केले आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रवेशपत्र संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना डाऊनलोड करून घ्यावे लागतात. एका अर्थाने मंडळाने हायटेक विचार केला आहे. यंदाच्या बारावी परीक्षेसंदर्भात मंडळ नियोजन करीत असून प्रवेशपत्रासह केंद संचालक व परिरक्षक बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थी परीक्षा प्रवेशपत्रावर मंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत कडक सूचना दिलेल्या आहेत. विद्यार्थी प्रवेशपत्रावर विद्यार्थी नाव, कनिष्ठ महाविद्यालय कोड, विषयाचे नाव व कोड, केंद्र क्रमांक, उत्तर लेखनाची भाषा आदी प्रकारची माहिती दिली जाते; परंतु यंदाच्या परीक्षेपासून मंडळाने अभिनव निर्णय घेतला आहे.  विद्यार्थी परीक्षा प्रवेशपत्रावर आता संबंधित विद्यार्थ्यांस कुठल्या विषयाचे पेपर कधी आहेत ते कळणार आहे. मंडळाने नवीन बदल केला असून संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र एकच आहे. परीक्षेचा विषय व तारीख; तसेच सत्र याची ठळक नोंद प्रवेशपत्रावर करण्यात आली आहे. राज्य मंडळाने ऑनलाइन कामकाज सुरू केल्यापासून अनेक कामे जलद व सुकर होत आहेत. मंडळाने यंदा हॉलतिकिटावर परीक्षेचे वेळापत्रक दिले आहे, हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया अंकुशनगर येथील छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. अरुण कुलकर्णी यांनी दिली आहे. 

राज्य मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकिटावर आता वेळापत्रक दिले आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूपच चांगली बाब आहे. 
- प्रा. राजेंद आंधळे, जामवाडी  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com