व्यायामामुळे वाढते क्रयशक्ती अन्‌ मनःशांतीही 

मनोज साखरे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

रात्री अल्प जेवण केल्यास मला सकाळी नियोजित वेळेत जाग येते. मी दररोज पाच ते सहा लिटर पाणी पितो. सकाळचे दोन तास व्यायाम व खेळासाठीच असतात. सुटीच्या दिवशी वॉकिंग करतोच आणि कधी कधी ट्रेकिंगही करतो.

 

औरंगाबाद - निरोगी शरीर व हसरं मन सृदृढ आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. शरीर सक्षम असलं तरच कर्माला महत्त्व आहे. व्यायामामुळे आरोग्यच नव्हे, तर मनही शांत राहतं.

मग आपल्या हातून सत्कार्य, दर्जेदार कामं होतात. क्रयशक्ती वाढून तक्रारींचा निपटारा व यथायोग्य निर्णय घेण्यासही मदत होते, असे व्यायामाचे महत्त्व पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी सांगितले. ते आपल्या दिनचर्येबाबत व्यक्त झाले. 

Image may contain: 1 person, pool, swimming and outdoor

हेही वाचा : सीसीटीव्ही : गुलेरने काच फोडून ते अशी करायची बॅग लिफ्टिंग 

मी नित्य साडेपाचला उठतो. पहाटे व्यायाम केल्यानंतर सकाळी सात ते आठ बॅडमिंटन खेळतो. आठ ते नऊ पोहतो. त्यानंतर सकाळी जास्त नाष्टा करतो. सकाळी साडेदहाला पोलिस ठाण्यात हजर असतो. मग कामांना सुरवात होते. दुपारी दोन ते अडीचदरम्यान जेवण करतो. यात आहार जास्त असतो. पुन्हा कर्तव्यावर काम करतो.

रात्री सर्व कामे आटोपून साडेदहाला घरी पोचतो. रात्री मात्र माझा आहार अल्प असतो. एक पोळी खाल्ली तर खाल्ली अन्यथा दूध अथवा फळ खाऊन झोपतो. रात्री अल्प जेवण केल्यास मला सकाळी नियोजित वेळेत जाग येते. मी दररोज पाच ते सहा लिटर पाणी पितो. सकाळचे दोन तास व्यायाम व खेळासाठीच असतात. सुटीच्या दिवशी वॉकिंग करतोच आणि कधी कधी ट्रेकिंगही करतो. 

Image may contain: one or more people, people standing, shoes, basketball court and indoor

श्री. घनश्‍याम सोनवणे सांगतात... 

  • खेळ व व्यायामासाठी सकाळी दोन तास दिल्यानंतर मला खूप शांत वाटतं. 
  • मनःशांतीचा माझ्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतात. चिडचिड होत नाही. 
  • व्यायामामुळे क्रयशक्ती वाढते. सहकाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासही मदत होते. 
  • व्यायामामुळे द्वेषबुद्धी नाहीशी होते. आत्मविश्‍वास, सकारात्मक दृष्टिकोन वाढतो. 
  • निकोपता वाढीस लागते. मनःशांती आणि कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहते.  

हेही वाचा : सेक्‍ससाठी तीन हजारांचा रेट या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगणा अटकेत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exercise also increases purchasing power and peace of mind